कोबीला मागणीच नसल्याने भुर्दंड

मंचर-कोबी पिकाचे बाजार भाव कोसळल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे कोबीमध्ये शेतकऱ्यांनी बकरे सोडली आहेत. कोबी पिक पूर्णतः अंगावर आल्याने कोबी काढणे आणि बाजारपेठेत पाठवणे परवडत नसल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. मागील पंधरा दिवसांपासून कोबीला बाजारपेठेत कवडीमोल दर मिळत आहे. काही शेतकऱ्यांनी तर उभे पिक उद्‌ध्वस्त करून टाकले. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
आंबेगाव तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये तरकारी पीके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. त्यामध्ये कोबी आणि फ्लॉवर ही पिकेही मोठ्या क्षेत्रावर घेतली जातात. परंतु सध्या एक ते तीन रुपये किलो दराने कोबीची विक्री होत आहे. हा बाजारभाव शेतकऱ्यांना परवडत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी कोबी पिकात बकरे आणि बैले सोडली आहेत. एकरी 50 ते 60 हजार रुपये खर्च करून घेतलेल्या पिकातून एक रुपयाही मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. मागील एक ते दीड महिन्यापासून विविध पिकांचे बाजारभाव कोसळले आहेत. याचा फटका ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बसत आहे. सध्यातरी एकरी 50 ते 60 हजार रुपये आर्थिक भुर्दंड बसत आहे. हा सहन करुन शेतकरी काढणीला आलेल्या कोबी पिकात बाजारभाव नसल्याने जनावरे सोडत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)