कोपर्डे हवेलीत 14 तोळ्याचे दागिने लंपास

सीसीटीव्हीत चोरटे कैद, चोरीचे सत्र सुरूच
कोपर्डे हवेली, दि. 11 (वार्ताहर) – दोन वेगवेगळ्या ठिकाणी जबरी चोरी करून चोरट्यांनी 14 तोळ्यांचे दागिने आणि दोन हजाराची रोकड लंपास केल्याची घटना शनिवारी (दि. 10) रात्री एकच्या सुमारास कोपर्डे हवेली (ता. कराड) येथे घडली. टाळगाव आणि साळशिरंबे येथील चोरीच्या घटना ताज्या असतानाच कोपर्डे हवेलीतील जबरी चोरीमुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण कायम आहे.
या घटनेची माहिती अशी, कोपर्डे हवेलीतील मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या संगिता सुनील रसाळ यांच्या घरात शनिवारी (दि. 10) रात्री चार चोरट्यांनी प्रवेश केला. संगिता यांच्या गळ्यातील चेन चोरत असतानाच संगिता रसाळ जाग्या झाल्या. परंतु, डोळ्यावर बॅटरीची लाईट मारल्याने त्यांना समोरचे काही दिसले नाही. त्यांनी चेन ओढून धरली होती. मात्र, चोरट्याने जोरात हिसका दिल्याने सोडून चोरट्याच्या हातातील लोखंडी रॉड पकडला. त्यावेळी चोरट्याने रॉड सोड, नाहीतर आमच्याकडे चाकू आहे, अशी भिती घातल्याने त्यांनी रॉड सोडला. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रानजीकच्या शिवाजी किसन साळवे यांच्या घराकडे वळविला. दाराची कडी काढून घरात प्रवेश केला. आतील खोलीत असलेल्या कपाटाचे दार उघडून कपाटातील सुमारे बारा तोळ्याचे दागिने आणि दोन हजार रुपये चोरून पोबारा केला. पळून जाताना पिंटू लोहार यांची गाडी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाडीतील पेट्रोल संपल्याने गाडी कराड-मसूर रस्त्यावरील भवानीचा ओढ्यानजीक गाडी सोडून चोरटे पसार झाले. दरम्यान, चोरटयांनी आणखी दोन-तीन ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला. परंतु, लोक जागे झाल्यामुळे त्यांचा प्रयत्न फसला. या घटनेची नोंद तालुका पोलीस ठाण्यात झाली असून हवालदार लावंड तपास करत आहेत.

चोरटे सीसीटीव्हीत कैद..
शिवाजी किसन साळवे यांच्या घरानजिक असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चार चोरटे कैद झाले आहेत. दरम्यान, जबरी चोरीमुळे सातारहून श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. घटनास्थळापासून वडोली निळेश्वर रस्त्यावर येवून श्‍वान तेथेच घुटमळले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)