कोपर्डे हवेलीत कृष्णा नदीसह स्मशानभूमीची स्वच्छता

कोपर्डेहवेली – गेल्या दीड वर्षापासून वेगवेगळ्या ठीकाणी कोपर्डे हवेलीत स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. नुकतेच कृष्णा नदीसह स्मशानभूमीत ग्रामस्थासह युवा मंचच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्तरावर स्वच्छतेचे कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. वाढत्या औद्योगिकरणामुळे नद्या अस्वच्छ झालेल्या आहेत. त्याचा परिणाम मानवी जीवनावर होवून रोगराईला निमंत्रण मिळत आहे.

नद्यालगत अनेक गावाच्या नळपाणी पुरवठा योजनेचा पाणी पुवठा केला जातो. या योजनांना पाणी दुषित होत असल्याने पाणी शुध्दीकरणाला मर्यादा पडत आहेत. हाच विचार करून कोपर्डे हवेली येथे नदीपात्रालगत व स्मशानभूमी परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले.

-Ads-

नदीला जलपर्णी वनस्पतीचा विळखा पडला होता. तर नदीपात्राच्या कडेला अस्वच्छता पसरली होती ती काढण्यात आली. स्मशानभूमीच्या आजूबाजूला कचरा साचला होता तोही काढण्यात आला. स्वच्छता अभियानामध्ये पोपट चव्हाण, बाळासाहेब तुपे, आर. एन. चव्हाण, सुजित साळवे, रेवण चव्हाण, रमेश चव्हाण, विशाल चव्हाण, तुषार चव्हाण आदीसह ग्रामस्थ, युवा मंचचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)