कोपरगाव शहरातून 51 हजारांचा ऐवज लांबवला

कोपरगाव – शहरातील बसस्थानकासमोरील काले टॉवरमधील एका घरातून भामट्यांनी टीव्ही, सोने-चांदीचेदागिनेआणि 15 हजार रोख असा 51 हजारांचा ऐवज लांबवला. सोमवारी पहाटेही चोरी झाली. कालेटॉवरध्ये कैलास विश्‍वनाथ वरखेडे रहातात. तेकुटुंबासह गावी गेलेहोते. सोमवारी पहाटे घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यांनी एलइडी टीव्ही, सोन्याचे दागिने, चांदीची बिस्कीटे व रोख 15 हजार रुपये असा 51 हजारांचा ऐवज लांबवला. सोमवारी सकाळी वरखेडे आल्यानंतर त्यांना दरवाजाचे कडीकोयंडे तोडलेलेदिसले. घरात सामानाची उचकापाचक केलेली आढळली. त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. या प्रकरणी साहाय्यक फौजदार थोरात पुढील तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)