कोपरगाव येथे सर्वधर्मीय विवाह सोहळयाचे आयोजन

अभिष्टचिंतन सोहळा समिती व संजीवनी युवा प्रतिष्ठानचा उपक्रम
कोपरगांव – संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक, शंकररावजी कोल्हे यांच्या नऊ दशकपुर्ती निमीत्त अभिष्टचिंतन सोहळा समिती व संजीवनी युवा प्रतिष्ठानर्फे कोपरगांव येथे दि. 29 जुन रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळयाचे आयोजन करण्यांत आले आहे. तरी इच्छुकांनी लाभ घेण्याचे आवाहन संजीवनी युवा प्रतिष
कोल्हे म्हटले, माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी संजीवनी उद्योग समुह तसेच विविध संस्थांच्या माध्यंमांतुन कोपरगांव मतदार संघात व संजीवनीच्या कार्यक्षेत्रात मोठया प्रमाणांत सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक योगदान दिले असून त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन दरवर्शी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते.
या सोहळ्यात ज्या वधु वराचा विवाह करावयाचा आहे त्यांचा वयाचा दाखला, आधार कार्ड झेरॉक्‍स, रहिवासी दाखला, दोन फोटो, रेशनकार्ड झेरॉक्‍स, पालकांचे संमतीपत्र या कागदपत्रांसह संजीवनी पतसंस्था कोपरगांव येथे संपर्क साधावा. तसेच ज्या वधु वरांचा वयाचा दाखला नसेल त्यांनी ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकिय अधिकाऱ्यांचा वयाचा दाखला आणावा व जास्तीत जास्त इच्छुकांनी नांव नोंदणी करावी असे आवाहन कोल्हे यांनी केले आहे. याप्रसंगी नव वधुवरांना मंगळसुत्र, विवाहवस्त्र, संसारपयोगी वस्तु, विमा संरक्षण आदी पुरविले जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)