कोपरगाव बसस्थानकासाठी 5 कोटी 93 लाखाच्या खर्चास मंजुरी 

आमदार स्नेहलता कोल्हे यांचा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे पाठपुरावा

कोपरगाव – मतदारसंघातील नागरिकांच्या सोयीसाठी अत्याधुनिक सुसज्ज असे कोपरगाव बसस्थानक इमारत बांधकामासाठी 5 कोटी 92 लाख 98 हजार रूपये खर्चाच्या कामास परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मंजुरी दिल्याची माहिती आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिली.
आ. कोल्हे म्हणाल्या, की कोपरगाव बसस्थानकाची सध्याची इमारत अत्यंत जुनी झाली आहे. तिच्या नुतणीकरणाबाबतचा प्रस्ताव कोपरगाव आगार ते मंत्रालय असा मार्गी लावत. त्यास 2018-19 या आर्थिक वर्षात लेखाशिर्ष फ 6 अन्वये नाशिक प्रदेशसाठी द्यावयाच्या निधीतून हे काम मार्गी लावण्याबाबतचे सुधारित प्रशासकीय मंजुरी आदेश 7 जुलै रोजी राज्य परिवहन महामंडळाच्या महाव्यवस्थापक तथा कार्यकारी अभियंता यांनी दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परिवहन मंत्री दिवाकर रावते, राज्यमंत्री विजय देशमुख, पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह कार्यकारी संचालक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मुंबई व नगर आगार यांनी विषेष सहकार्य दिले. त्यासर्वांचे आमदार कोल्हे यांनी आभार मानले आहे.
आमदार स्नेहलता कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की कोपरगांव बसस्थानक सुसज्ज अदयावत इमारतीसाठी 3 कोटी 48 लाख 17 हजार 163, वाहनतळ भराव कामासाठी 95 लाख 55 हजार, संरक्षक भिंत कम्पाउंड 22 लाख 13 हजार 641, जुनी इमारत पाडण्यांसाठी 2 लाख विदयुतीकरणांसाठी 23 लाख तर या बसस्थानकांत आगप्रतिबंधक उपाययोजनेसाठी 5 लाख असे एकूण 5 कोटी 92 लाख 98 हजार रूपये खर्चास सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
पावसाळी अधिवेशन सध्या नागपूर येथे सुरू आहे. त्यात या प्रश्‍नावर मंत्री दिवाकर रावते यांचे लक्ष वेधून त्यांच्याकडून यास मान्यता मिळविली. त्याचबरोबर मतदारसंघातील अन्य विकासकामे व प्रस्ताव तसेच शेती निगडीत प्रलंबित बाबी प्रश्‍नोत्तर लक्षवेधी बैठकीच्या माध्यमातून सोडविण्यासाठी काम सुरू असल्याचेही आ. कोल्हे यांनी सांगितले.
अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या बसस्थानकाच्या प्रश्‍नाला यामुळे चालना मिळेल व शहर वैभवात आणखी एका सुसज्ज इमारतीची भर पडेल. त्याबद्दल आ. कोल्हे व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांचे भाजप तालुकाध्यक्ष शरद थोरात शहराध्यक्ष कैलास खैरे, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, युवकचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पानगव्हाणे, शहराध्यक्ष वैभव आढाव, संजीवनी कारखान्याचे उपाध्यक्ष सोपानराव पानगव्हाणे, उपनगराध्यक्ष विजय वाजे, गटनेते योगेश बागुल, रवींद्र पाठक, केशव भवर, त्र्यंबकराव सरोदे, माजी सभापती शिवाजी वक्‍ते, मच्छिंद्र केकाण, मच्छिंद्र टेके, सुनील देवकर सर्व नगरसेवक, भाजप पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)