कोपरगावात वीज रोहित्राचे लोकार्पण 

औद्योगिक वसाहतीसाठी निधी मिळेल ः आ. कोल्हे
कोपरगाव  –  येथील औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांसाठी अखंडीत वीज मिळावी यासाठी बसवलेल्या 10 एमव्हीए वीज रोहित्राचे लोकार्पण आमदार स्नेहलता कोल्हे व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या हस्तेझाले.
अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष संजय सातभाई होते. यावेळी बिपीन कोल्हे म्हणाले, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मतदार संघातील दैनंदिन व शेतीच्या वापराचा वीज प्रश्‍न सोडवण्यासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी दिला. ग्रामीण भागासाठी 186 तर शहरासाठी 36 वीज रोहित्र दिले.शहरातील भूमिगत वीज वाहिनींसाठी 45 कोटी रूपयांचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे.
आमदार स्नेहलता कोल्हेम्हणाल्या, कोपरगाव औद्योगिक वसाहतीच्या अंतर्गत विकासासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाईयांच्याकडे 1 कोटी 95 लाख रूपयांची मागणी केली आहे. त्यास लवकरच निधी मिळेल.
औद्योगिक वसाहतीचे संचालक केशव भवर, पराग संधान, अनिल सोनवणे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र शिंदे, हाशमभाई पटेल यांच्या हस्ते उपस्थितांचा सत्कार करण्यात आला. वीज वितरण कंपनीचेसाहाय्यक कार्यकारी अभियंता जितेंद्र महाजन म्हणाले, एकात्मिक उर्जाविकास योजनेंतर्गत 33 बाय 11 केव्ही औद्योगिक वसाहत उपकेंद्राची क्षमता दहा एमव्हीए वाढवण्यात आली. उद्योजकांसह कोपरगाव शहरातील वीज लोड तीन फिडरमध्ये विभाजित करून वीज ग्राहकांचा प्रश्‍न सोडवण्यात आला.
संजय सातभाईम्हणाले, शहराच्या विकासासाठी आमदार स्नेहलता कोल्हेयांनी निळवंडे ते शिर्डी व कोपरगाव अशी पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर करून घेतली. कोपरगाव वासियांसाठी सुमारे260 कोटी खर्चास प्रशासकीय मान्यता मिळवली. यातून कोपरगावचा कायापालट होईल. हायटेक इंडस्ट्रीजचे महेश खडामकर यांनी वृक्षारोपणासाठी पंधरा लोखंडी जाळ्या दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. नाशिक वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता बजरंग खंदारे, साहाय्यक अभियंता पांडेउपस्थित होते. सूत्रसंचालन साहाय्यक अभियंता दिगंबर वर्पे यांनी केले. पंडित भारूड यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)