कोपरगावात युवकाने घेतला गळफास

शहरातील संजयनगर येथील घटना

कोपरगाव – शहरातील एका युवकानेघरासमोरील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना संजयनगर भागात गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली.

शहरातील संजयनगर भागामध्ये बैलबाजार रोडवर राहणाऱ्या सेवक साहेबराव पाखरे(वय 25) या युवकाने गुरूवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घरासमोरील झाडाला गळफास घेतला. हे लक्षात आल्यावर मृतदेह खाली घेवून ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आला. डॉक्‍टरांनी सेवक हा मृत झाल्याचे सांगितले. याप्रकरणी ग्रामीण रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या खबरीवरून शहर पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली. पुढील तपास साहाय्यक फौजदार रमेश भालेराव करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)