कोपरगावात महाविद्यालयीन तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या (पासपोर्ट फोटो)

कोपरगाव – महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या तरुणाने घरातील पंख्याच्या हुकला दोरी लावून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री आठच्या सुमारास येथे घडली. शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मनोज बाबासाहेब तुपे (वय 20, रा. धांदलगाव, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
मनोज हा संजीवनी अभियांत्रिकीचा विद्यार्थी होता. शहरातील बागूल वस्ती येथे अजित सुरेश कोरके यांच्या खोलीमध्ये तो राहत होता. त्याचे चार मित्रही त्या खोलीमध्ये राहत होते. त्याने रविवारी रात्री आठच्या सुमारास घरी कोणी नसताना राहत्या खोलीतील आतली कडी लावून पंख्याच्या हुकला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मनोजच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)