कोपरगावातील महामार्गाने घेतला मोकळा श्‍वास

काटवनाची सफाई; धोकादायक वळणे कमी करण्याचे आमदारांचे आदेश

कोपरगाव – कोपरगाव शहर हद्दीतील टाकळी फाटा ते साईबाबा तपोभूमी दरम्यानच्या नगर-मनमाड महामार्गाशेजारी काटयांचे कुंपन वाढल्याने अनेकांचा अपघाती मृत्यू झाला होता, त्यावर “प्रभात’ने प्रकाश टाकल्यानंतर संबधित विभागला व रस्त्याच्या ठेकेदाराला जाग आली. आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या साक्षीने या रस्त्यावरील काटवनाचा जेसीबीच्या साह्याने संपूर्ण सफाया करण्यात आला.
वाहतुकीला अडथळा ठरत असलेले काटवन, झाडे-झुडपे काढून रस्ता वाहतूकयोग्य करण्याचे काम सोमवारी सुरू झाले. या वेळी सुमित कोल्हे, उपनगराध्यक्ष विजय वाजे, भाजपचे तालुकाध्यक्ष शरद थोरात, पराग संधान, नगरसेवक जनार्दन कदम, बाळासाहेब आढाव, बाळासाहेब नरोडे यांनी प्रत्यक्ष समोर उभे राहून धोकादायक काटवन काढून घेतले. या महामार्गावर विविध ठिकाणी अपघाती दुभाजक, वळणे आहेत. ते काढण्याचे आदेश आ. कोल्हे यांनी संबंधित ठेकेदाराला दिले. अनेक ठिकाणी दिशादर्शक पट्टे मारणे, वळणाचे दिशादर्शक फलक लावणे, ठळक रेडियम लाईटस्‌ व आवश्‍यक तिथे आडवे पांढरे पट्टे लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. भविष्यात या भागात अपघात होणार नाहीत, याची दक्षता घेण्याच्या सूचना आमदारांनी दिल्या.
साईधाम कमानी जवळचा रस्ता रूंद करून त्या ठिकाणी दोन मोठया सिमेंट नळया टाकण्यात आल्या. रस्ता रूंद व सुरक्षित करण्यात आला आहे. या वेळी संजय पवार, पंडित पंडोरे, इन्फ्रास्ट्रक्‍चर ऍन्ड टोल रोड प्रा.लि. कंपनीचे कर्मचारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महामार्गाशेजारी राहणारे काही नागरिक रस्त्याच्या शेजारच्या काटवनाच्या आडून अतिक्रमण करीत आहेत. ते काटवन काढले, तर आपली अडचण होईल, असे वाटल्याने काटवन काढण्यास नागरिक विरोध करतात, अशी तक्रार ठेकेदाराने आमदार कोल्हे यांच्याकडे केली. त्यामुळे आ. कोल्हे,उपनगराध्यक्ष वाजे व अन्य कार्यकर्त्यांनी स्वतः उभे राहून काटवन काढण्यास ठेकेदाराला मदत केली.

तालुक्‍यातील अन्य रस्तेही मोकळे

रस्त्याच्या काटवनाबाबत “प्रभात’ ने आवाज उठविल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने कोपरगाव तालुक्‍यातील मुंबई-नागपूर द्रुतगती मार्गावरील पुणतांबे फाटा ते वैजापूर हद्दीपर्यंत तसेच रवंदे ते धामोरी, धामोरी ते ब्राम्हणगाव या रस्त्यावरील काटवन, झाडेझुडपे काढण्याचे काम सुरू केले आहे. काटवनाच्या कुंपनातून तालुक्‍यातील रस्ते आता मोकळा श्वास घेणाक आहेत. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)