कोपरगावमध्ये 18 गावांमध्ये एक गाव एक गणपती

कोपरगाव – कोपरगाव तालुक्‍यात 18 गावांमध्ये एक गाव एक गणपती बसविण्यात आला आहे. कोपरगाव शहरात 160 तर ग्रामीण भागात 159 गणेश मंडळांनी यंदा श्री ची प्रतिष्ठापणा केली आहे.

यापैकी धोत्रं, घारी, लौकी, कोळगावथडी, शिरसगाव, बोलकी, गोधेगाव, भोजडे, खोपडी, सावळगाव, ओगदी, तळेगाव मळे, हिंगणी, मोर्विस, वडगाव, बक्तरपूर यासह अन्य गावात एक गाव एक गणपती बसविण्यात आला आहे. शहरी भागातील चांदगव्हाण, डावूच बु! या गावातही एक गाव एक गणपती बसविण्यात आला आहे.

ग्रामणी भागामध्ये 159 गणपती मंडळाने गणेशाची प्रतिष्ठापणा केली आहे. त्यामध्ये 105 सार्वजनिक गणेश मंडळ, 37 बाल गणेश मंडळ, 1 खाजगी तर 16 एक गाव एक गणपती मंडळाचा सामावेश आहे. शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 160 गणेश मंडळांनी श्रीगणेशाची प्रतिष्ठापणा केली आहे. त्यामध्ये 151 सार्वजनिक गणेश मंडळ, 7 बालगणेश मंडळ, 2 एक गाव एक गणपती मंडळांचा समावेश आहे. तालुक्‍यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस निरीक्षक साहेबराव कडनोर व सुरेश शिंदे यांनी चोख पोलीस बंदोबस्त लावला आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे पोलीस सुत्राकडून सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)