कोपरगावमधील जुगार अड्ड्यावरील छाप्यात 30 लाख ऐवज जप्त

माजी नगरसेवक, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य गजाआड
कोपरगाव – नगर मनमाड रस्त्यावरील साईतेज हॉटेलवर छापा टाकून जुगार व पत्ते खेळतांना माजी नगरसेवक, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांसह अनेक धनीकांना पोलीसांनी रंगेहाथ पडले असून त्यांच्याकडून रोख रक्‍कमेसह वाहने असा 30 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
नगर ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या पथकाने आज संयुक्तिकपणे ही कारवाई केली. छाप्यात जुगार व पत्ते खेळतांना 28 जणांना रंगेहात पकडून त्यांच्याकडून रोख 1 लाख 83 हजार रुपये, 29 मोबाइल, सहा चारचाकी व दहा दुचाकी असे मिळून अंदाजे 30 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला. 28 आरोपींना अटक करण्यात आली असून याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
आतापर्यंतची हि सर्वात मोठी कारवाई आहे. छापा टाकताच मोठी पळापळ झाली. चार ते पाच जण पळून गेले. अटक केलेल्यात हॉटेल मालक अस्लम सलीम सोनेवाला (मनमाड), रोहित हमीद खाण (येवला), वसंत लक्ष्मण वढे (येवला), वाल्मिक भगत कोळपे (कोळपेवाडी, कोपरगाव), बबलू अब्दुल शेख (मालेगाव), श्रीराम पंढरीनाथ लाटे (शिवूर वैजापूर), निस्सार अन्सार शेख (येवला), तुषार नारायण मेहारखाब (सुरेगाव), शकील आरिफ अन्सारी (नाशिक), विवेक अनिल घोडके (मनमाड), सनिश वसंत सोनवणे (वैजापूर), दयानंद रतन जावळे (येवला), संजय दिनकर निकम (मनमाड), कैलास हिरालाल जेजुरकर (अंदरसूल), समध रशीद शेख (एरंडगाव ,येवल), एत्तेफार्श्‍या गुलजार शहा (वैजापूर), निलेश गोपीनाथ लोंढे (येवला), निलेश रायभान कापसे (अंदरसूल), सुनील सूर्यभान खडांगळे (येवला), नवनाथ भास्कर मोरे (गोधेगाव, येवला), मनोज मधुकर पानगव्हाणे (उगाव ,निफाड), गुलाब महमद हनीफ शहा (मनमाड), मनोज प्रभाकर दानी (येवला), शिवा नाना हिरे (येवला), सचिन शामलाल बिवाल (येवला), वामन देवमन मेहरखांब (सुरेगाव), गंगाधर मधुकर चव्हाण (निफाड), व बालाजी सटवाजी मेढे (नांदेड) यांचा समावेश आहे.
एका गुप्त बातमीदारामार्फत कालवानिया व पाटील यांनी या जुगार अड्ड्याची माहिती मिळाली त्यानुसार ही कारवाई केली. यावेळी ग्रामीण पोलीस निरीक्षक साहेबराव कडनोर यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सुधीर पाटील, बाळासाहेब मुळीक, संदीप घोडके, विशाल गवांदे, दिनेश मोरे, अण्णा पवार, मेघराज कोल्हे, चालक बबन बेरड तसेच नगर ग्रामीणचे कालवानिया यांच्यासह सहायक फौजदार कल्याण शेळके, बी आर. परकाळे, गणेश धुमाळ, बाबासाहेब काकडे, किरण अरकल, अण्णा डाके, धनंजय करंडे, चालक अर्जुन बढे आदींचा या पथकात समावेश होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)