‘कोपरगाव’चा विकास हाच ध्यास

सहकाराने नटलेल्या आणि ग्रामीण अर्थकारणाची कामधेनू असलेल्या बारमही गोदावरी कालव्यांच्या पाण्याने शेती, शेतकरी आणि तालुक्‍याला अधिकाधिक समृध्द करण्यासाठी आजवर सर्वांनीच कष्ट घेतलेले आहेत. या तालुक्‍याची महिला प्रतिनिधी म्हणून जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्क्‌याने आपल्याला मतदारांनी संधी दिली. त्याचे सोने करण्याचे काम गेल्या तीन वर्षात करण्याचा प्रयत्न केला आहे. तालुक्‍याच्या मागील दहा वर्षाच्या विकासाचा अनुशेष भरून काढताना प्रत्येकवेळी आपली दमछाक झाली आहे. तरीही जनतेने टाकलेला विश्वास सार्थ करण्यासाठी तुटपुंज्या स्थानिक विकास निधी व्यतिरिक्त शासनाच्या अन्य योजनांतून विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी ध्यास घेऊन कार्यरत राहिले आहे.

ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा असलेल्या कोपरगाव तालुक्‍याला सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि शैक्षणिक परंपरा देखील मोठया प्रमाणात आहे. सहकाराने नटलेल्या आणि ग्रामीण अर्थकारणाची कामधेनू असलेल्या बारमही गोदावरी कालव्यांच्या पाण्याने शेती, शेतकरी आणि तालुक्‍याला अधिकाधिक समृध्द करण्यासाठी आजवर सर्वांनीच कष्ट घेतलेले आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत या तालुक्‍याची महिला प्रतिनिधी म्हणून जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्क्‌याने आपल्याला मतदारांनी संधी दिली. त्याचे सोने करण्याचे काम गेल्या तीन वर्षात करण्याचा प्रयत्न केला आहे. तालुक्‍याच्या मागील दहा वर्षाच्या विकासाचा अनुशेष भरून काढताना प्रत्येकवेळी आपली दमछाक झाली आहे. तरीही जनतेने टाकलेला विश्वास सार्थ करण्यासाठी तुटपुंज्या स्थानिक विकास निधी व्यतिरिक्त शासनाच्या अन्य योजनांतून विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला आहे. याची आकडेवारी वेळोवेळी सर्वांसमोर मांडण्याचा आपण प्रयत्न केला आहे.

या तालुक्‍याचे 70 हजार 613 हेक्‍टर भौगोलिक क्षेत्र असून 38 हजार 371 हेक्‍टर क्षेत्र बागायती आहे. 6 हजार 638 हेक्‍टर क्षेत्र विहिरीखाली तर 11 हजार 739 हेक्‍टर क्षेत्र गोदावरी कालव्याखाली आहे. 22 हजार 372 हेक्‍टर क्षेत्र हे जिरायती आहे. सोळा गावे खरिपाची आहेत. तालुक्‍यातील शेतक-यांवर गारपीट, नैसर्गिक-अनैसर्गिक अनियमितता, खरीप व रब्बी हंगामात पावसाअभावी झालेले नुकसान, दुष्काळ व आपत्तीत वेळोवेळी शासन तसेच संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी सर्वार्थाने मदत केली आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत तालुक्‍यातील 35 पैकी 19 सरपंच हे भाजपचे जनतेतून निवडून आलेले आहेत. तर सर्वाधिक 195 ग्रामपंचायत सदस्यही भाजपचेच निवडले आहेत.

रस्ते, वीज, पाणी आणि आरोग्य या चार मूलभूत प्रश्‍नांशी कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचा निकटचा संबंध येतो. यात उदभवलेल्या अडीअडचणी सोडवून त्यावर मात करण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला आहे. युती शासन सत्तेवर आले आणि पहिल्या 100 दिवसांतच मतदारसंघासाठी 100 कोटी रूपयांचा विकास निधी मिळविला. हा आजवरच्या सर्वच लोकप्रतिनिधींच्या कारकिर्दीत एक मैलाचा दगड ठरलेला आहे. तालुक्‍याच्या पूर्व भागात शेतक-याला समृध्द करण्यासाठी जीवाचे रान केले आहे. तद्वतच पश्‍चिम भागातील जिरायती भागातील शेतक-यांच्या दारात निळवंडे धरणाचे पाणी कालव्याद्वारे मिळावे यासाठी हा प्रकल्प केंद्र शासनाच्या एआयबीपी योजनेत समाविष्ट करून त्यासाठी श्री साईबाबा संस्थानकडून 500 कोटी रूपयांचा निधी मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून प्रयत्न केले. ते काही प्रमाणात यशस्वी होऊन त्याबाबतचा निर्णय झाला आहे.

पुणतांबा-रस्तापूर पाणी पुरवठा योजनेसाठी जलस्वराज्य 2 योजनेतून 15 कोटी रूपये खर्चाच्या योजनेसाठी शेती महामंडळाची जमीन मिळविली. त्याचप्रमाणे कोकमठाण गावच्या पिण्याच्या पाणी योजनेसही 3.33 हेक्‍टर शेती महामंडळाची जमीन मंत्रीमंडळ समितीकडून मंजूर करून आणली आहे. रांजणगाव देशमुख ते काकडी या रस्त्याच्या कामासाठी पुरवणी अर्थसंकल्प 2016-17 मध्ये दहा कोटी रूपयांची तरतूद केली आहे. ब्रिटीशकालीन गोदावरी पाटपाण्याचे कालवे खिळखिळे झाले असून त्याच्या दुरूस्तीसाठी 12 कोटी 55 लाख रूपये खर्चाच्या निविदा काढून त्याची कामे सुरू केली आहेत.

या तालुक्‍यातील शेतक-यांचे शेती उत्पादकता वाढविण्यासाठी ठिबक सिंचनाला प्राधान्य दिले आहे. त्यासाठीचे 2013-14 पासून रखडलेले 4 कोटी 58 लाख रूपयांचे अनुदान त्याचप्रमाणे खरीप हंगाम 2016-17 मध्ये भूईमुग व सोयाबीन पिकांचा 9 कोटी 99 लाख तर डाळींब पिकाचा 2 कोटी 43 लाख रूपयांचा पीकविमा मिळवून तो शेतक-यांच्या खात्यावर वर्ग केला आहे.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून संवत्सर-कान्हेगाव फाटा ते तळेगावमळे या रस्त्याचे 4 कोटी 87 लाख रूपयांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. कोपरगाव शहरात विजेच्या लोंबकळलेल्या तारा आणि त्यातून वाढणारे अपघात टाळण्यासाठी भूमीगत विद्युत वाहिनीच्या कामासाठी 50 कोटी रूपये खर्चाचा पथदर्शी प्रकल्प ऊर्जा मंत्रालयाकडून मंजूर करून घेऊन त्याच्या पहिल्या टप्प्यासाठी 5 कोटी रूपये खर्चाची कामे पूर्ण करण्यात आली. तर दुस-या टप्प्यात 7 कोटी 50 लाख रूपये खर्चाची कामे प्रस्तावित आहेत.

चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात मतदारसंघातील निकडीच्या रस्त्यांच्या कामासाठी व कोपरगाव-धारणगाव-कुंभारी-माहेगाव देशमुख-कोळपेवाडी-सुरेगाव ते राष्ट्रीय मार्ग-7 या रस्त्याच्या कामासाठी 5 कोटी रूपये मंजूर करून त्याचे कामही सुरू केले आहे. त्याचप्रमाणे कोपरगाव रेल्वेस्टेशन ते संवत्सर चौफुलीच्या रस्त्यासाठी व नारंदी काळामाथा पुलाच्या कामासाठी 3 कोटी 63 लाख रूपये मंजूर करून याही रस्त्याचे काम सुरू केले आहे.

एक आवर्तन वाढविले
दारणा व गंगापूर धरणांवर दिवसेंदिवस बिगर सिंचन पाण्याचा भार अनुक्रमे 71 व 52 टक्के झाल्याने त्याची झळ बारमही गोदावरी कालव्यांच्या पाटपाण्याच्या आवर्तनाला बसत असल्याबाबत जलसंपदामंत्री यांच्यासमोर आकडेवारीनिशी पटवून देऊन हा बिगर सिंचन पाण्याचा भार सर्व धरणांवर समान पध्दतीने विभागण्याबाबतचा निर्णय करून घेतला. त्यामुळे शेती पाण्याचे एक आवर्तन वाढले आहे.

शंभर दिवसांत शंभर कोटी…
कोपरगाव मतदारसंघातील रस्ते, वीज, पाणी आणि आरोग्य हे चार मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी उदभवलेल्या अडीअडचणींवर मात करण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला आहे. युती शासन सत्तेवर आले आणि पहिल्या 100 दिवसांतच मतदारसंघासाठी 100 कोटी रूपयांचा विकास निधी मिळविला. हा आजवरच्या सर्वच लोकप्रतिनिधींच्या कारकिर्दीत एक मैलाचा दगड ठरलेला आहे. तालुक्‍याच्या पूर्व भागात शेतक-याला समृध्द करण्यासाठी जीवाचे रान केले आहे. तद्वतच पश्‍चिम भागातील जिरायती भागातील शेतक-यांच्या दारात निळवंडे धरणाचे पाणी कालव्याद्वारे मिळावे यासाठी हा प्रकल्प केंद्र शासनाच्या एआयबीपी योजनेत समाविष्ट करून त्यासाठी श्री साईबाबा संस्थानकडून 500 कोटी रूपयांचा निधी मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून प्रयत्न केले. ते काही प्रमाणात यशस्वी होऊन त्याबाबतचा निर्णय झाला आहे.

इमारतींसाठी भरघोस निधी
कोपरगाव पंचायत समिती इमारत विस्तार (सुमारे 5 कोटी), कोपरगाव बसस्थानक इमारत (5 कोटी), कोपरगाव नगरपालिका इमारत (5 कोटी), 42 कोटी रूपये खर्चाची सुधारीत पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी अपुरा पडणारा (5 कोटी) निधी मंजूर करून आणला आहे. या योजनेचे काम जवळजवळ 80 टक्के पूर्ण झाले आहे तर निळवंडे धरणातून कोपरगावसाठी थेट पाईपलाईनद्वारे सुमारे 260 कोटी रूपये खर्चाच्या पाणीयोजनेस प्रशासकीय मान्यताही मिळविली आहे. कोपरगाव खुले नाट्यगृह बृहत विकासासाठी (10 कोटी) तसेच अन्य विकासाचे प्रस्ताव मंत्रालयीन स्तरावर सादर केलेले आहेत.

जिल्हा नियोजन समितीकडून स्मशानभूमी बैठक शेड, पेव्हींग ब्लॉक, हायमास्ट दिवे, सिमेंट रस्त्याच्या कामासाठी 1 कोटी 71 लाख रूपयांचा निधी मिळवून ती मार्गी लावली आहेत. कोपरगाव शहर व ग्रामीण अल्पसंख्याक बहुल विभागासाठी 75 लाख रूपयांचा निधी मंजूर करून त्याची कामे निविदास्तरावर आहेत. कोपरगाव शहरासाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी 4 कोटी 91 लाखांचा निधी मंजूर करून आणला आहे. तर सफाई कर्मचा-यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य निवासस्थानासाठी 15 कोटी, दलितवस्ती रस्ते सुधार योजनेसाठी 88 लाख रूपयांचा निधी तसेच ग्रामीण पोलिस ठाणे इमारतीसाठी निधी मिळावा यासाठी नागपूर हिवाळी अधिवेशनात पाठपुरावा सुरू आहे.

शंभर दिवसांत शंभर कोटी…
कोपरगाव मतदारसंघातील रस्ते, वीज, पाणी आणि आरोग्य हे चार मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी उदभवलेल्या अडीअडचणींवर मात करण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला आहे. युती शासन सत्तेवर आले आणि पहिल्या 100 दिवसांतच मतदारसंघासाठी 100 कोटी रूपयांचा विकास निधी मिळविला. हा आजवरच्या सर्वच लोकप्रतिनिधींच्या कारकिर्दीत एक मैलाचा दगड ठरलेला आहे. तालुक्‍याच्या पूर्व भागात शेतक-याला समृध्द करण्यासाठी जीवाचे रान केले आहे. तद्वतच पश्‍चिम भागातील जिरायती भागातील शेतक-यांच्या दारात निळवंडे धरणाचे पाणी कालव्याद्वारे मिळावे यासाठी हा प्रकल्प केंद्र शासनाच्या एआयबीपी योजनेत समाविष्ट करून त्यासाठी श्री साईबाबा संस्थानकडून 500 कोटी रूपयांचा निधी मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून प्रयत्न केले. ते काही प्रमाणात यशस्वी होऊन त्याबाबतचा निर्णय झाला आहे.

कोपरगाव साईबाबा कॉर्नर ते कोपरगाव रेल्वेस्टेशन या रस्त्याच्या चौपदरीकरणास सुरूवात केली आहे. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याच्या पेयजल योजना गेल्या दहा वर्षापासून रखडल्या होत्या. त्यासाठी मतदारसंघातील उक्कडगाव-कोळगाव थडी या गावांना मुख्यमंत्री पेयजल योजनेतून 1 कोटी 88 लाख 85 हजार रूपये मंजूर करून आणले असून त्यापैकी कोळगाव थडीच्या पिण्याच्या पाणीपुरवठा मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेसाठी 52 लाख 64 हजार 219 रूपये खर्चाच्या कामाचा कार्यारंभ आदेशही काढला आहे. रांजणगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतील धोंडेवाडी गावातील पाईपलाईन कामासाठीही 1 कोटी रूपये मंजूर करून आणले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सेंद्रिय शेती विकास योजनेतून विविध गावच्या शेतक-यांना 45 लाख रूपये खर्चाचे शेतीविषयक साहित्याचे वाटप केले.

ग्रामीण विकास खात्याकडे शासनाच्या 2515 या हेडखाली अंतर्गत रस्ते डांबरीकरणासाठी 40 लाख तर 3054 या हेडखाली स्मशानभूमी पेव्हींग ब्लॉक, कब्रस्थान सुशोभीकरण अशा 22 कामांना 2 कोटी 20 लाख रूपयांचा निधी मंजूर करून त्याची कामे प्रगतिपथावर आहेत. दारणा व गंगापूर धरणांवर दिवसेंदिवस बिगर सिंचन पाण्याचा भार अनुक्रमे 71 व 52 टक्के झाल्याने त्याची झळ बारमही गोदावरी कालव्यांच्या पाटपाण्याच्या आवर्तनाला बसत असल्याबाबत जलसंपदामंत्री यांच्यासमोर आकडेवारीनिशी पटवून देऊन हा बिगर सिंचन पाण्याचा भार सर्व धरणांवर समान पध्दतीने विभागण्याबाबतचा निर्णय करून घेतला. त्यामुळे शेती पाण्याचे एक आवर्तन वाढले आहे.

मतदारसंघातील मौजे शिंगवे व कोकमठाण येथील 33 केव्हीएच्या वीज उपकेंद्राचे काम प्रगतिपथावर आहे, तर केंद्र शासनाच्या दीनदयाळ उपाध्याय योजनेतून मौजे संवत्सर येथे 33 केव्हीएचे वीज उपकेंद्र मंजूर करून घेतले आहे. उर्वरीत वीज उपकेंद्राची क्षमता वाढविण्याचे काम सुरू आहे. कोपरगाव शहराचे नागरीकरण दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहे. कोपरगाव शहर हद्दवाढ प्रस्ताव नगरविकास खात्याकडे मांडून व त्यावर जिल्हाधिका-यांसमवेत बैठक घेऊन हा प्रश्‍न मंत्रालयीन स्तरापर्यंत पोहोचविला आहे. कोपरगाव शहर व ग्रामीण पोलिस ठाण्यांच्या इमारतीचे तसेच कर्मचा-यांच्या वसाहती कामाचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहेत.

मतदारसंघातील गावांच्या कामकाजाच्या सुसूत्रीकरणासाठी काही गावे शिर्डी व राहाता पोलिस ठाण्यांना जोडण्यात आली आहेत. त्याचा नागरिकांना मोठया प्रमाणात त्रास होतो. तेव्हा ही गावे कोपरगाव ग्रामीण व शहर पोलिस ठाण्यांना जोडण्याबाबतची कार्यवाही अंतिम स्तरावर आहे. कोपरगाव पंचायत समिती इमारत विस्तार (सुमारे 5 कोटी), कोपरगाव बसस्थानक इमारत (5 कोटी), कोपरगाव नगरपालिका इमारत (5 कोटी), 42 कोटी रूपये खर्चाची सुधारीत पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी अपुरा पडणारा (5 कोटी) निधी मंजूर करून आणला आहे. या योजनेचे काम जवळजवळ 80 टक्के पूर्ण झाले आहे तर निळवंडे धरणातून कोपरगावसाठी थेट पाईपलाईनद्वारे सुमारे 260 कोटी रूपये खर्चाच्या पाणीयोजनेस प्रशासकीय मान्यताही मिळविली आहे.

कोपरगाव खुले नाट्यगृह बृहत विकासासाठी (10 कोटी) तसेच अन्य विकासाचे प्रस्ताव मंत्रालयीन स्तरावर सादर केलेले आहेत. जिल्हा नियोजन समितीकडून स्मशानभूमी बैठक शेड, पेव्हींग ब्लॉक, हायमास्ट दिवे, सिमेंट रस्त्याच्या कामासाठी 1 कोटी 71 लाख रूपयांचा निधी मिळवून ती मार्गी लावली आहेत. कोपरगाव शहर व ग्रामीण अल्पसंख्याक बहुल विभागासाठी 75 लाख रूपयांचा निधी मंजूर करून त्याची कामे निविदास्तरावर आहेत. कोपरगाव शहरासाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी 4 कोटी 91 लाखांचा निधी मंजूर करून आणला आहे. तर सफाई कर्मचा-यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य निवासस्थानासाठी 15 कोटी, दलितवस्ती रस्ते सुधार योजनेसाठी 88 लाख रूपयांचा निधी तसेच ग्रामीण पोलिस ठाणे इमारतीसाठी निधी मिळावा यासाठी नागपूर हिवाळी अधिवेशनात पाठपुरावा सुरू आहे.

महिला बचतगट ही आपली शक्ती आहे. बचतगटाच्या पायाच्या आधारावरच आपण विकासाची शिडी चढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या नारीशक्तीला सलाम करून त्यांच्यासाठी मतदारसंघात 3 हजार 200 बचतगट स्थापन करून त्याबाबतचे संपूर्ण मार्गदर्शन उपलब्ध केले. जिल्हा व राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या माध्यमातून सुमारे 30 कोटी रूपयांचे कर्ज वितरण या बचतगटांना केले आहे. महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठीही विशेष प्रयत्न केले आहेत. विकासासाठी आपण कायमच कटिबद्ध राहणार असून, जनतेने टाकलेला विश्वास सार्थ करण्यासाठी व मतदारसंघाच्या विकासासाठी ध्यास घेऊन काम करीत आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
2 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)