कोथिंबीर, मेथीचे भाव स्थिर

पिंपरी – मोशीतील नागेश्‍वर महाराज उपबाजारातील आठवड्यात फळभाज्या व पालेभाज्यांची आवक घटली आहे; मात्र पालेभाज्यांची आवक मात्र वाढली असून, भाव मात्र तेजीत आहेत. या आठवड्यात काकडी, टोमॅटो आणि लसणाची आवक वाढली आहे. तर कांदा, बटाटा आणि कैरीची आवक मात्र घटली आहे.

कोथिंबीर, मेथी पालेभाज्यांचे दुपटीने वधारलेले भाव आता स्थिर आहेत. फळभाज्यांची एकूण आवक 1 हजार 15 क्विंटल झाली असून, पालेभाज्यांची आवक 24 हजार 80 जुड्या एवढी झाली आहे. फळभाज्यांची आवक 38 क्विंटलने घटली आहे, तर पालेभाज्यांची आवक सहा हजार 470 जुड्यांनी वाढली. कांद्याची 120 क्विंटल आवक झाली असून, गेल्या आठवड्याच्या तुलनेत 46 क्विंटलची घट झाली असून, सरासरी भावात 50 रुपयांची किरकोळ घट झाली आहे. बटाट्याची 264 क्विंटल आवक झाली असून, 16 क्विंटलने वाढ झाली. भावदेखील 100 रुपयांनी वधारले.

भेंडीची आवक 13 क्विंटलने घटून भावात 100 रुपयांची घट झाली. गवारीची आवक एक क्विंटलने वाढून, भाव 250 रुपयांनी वधारले. तसेच टोमॅटोची आवक 32 क्विंटलने वाढली असून, भाव मात्र स्थिर राहिले. मटारची आवक आठ क्विंटलने वाढली असून, भाव 250 रुपयांनी वधारले. घेवड्याची आवक चार क्विंटलने वाढून भाव 250 रुपयांनी वधारले. दोडक्‍याची आवक दोन क्विंटलने वाढून, भाव 250 रुपयांनी वधारले. लसणाची आवक सात क्विंटलने वाढून भाव 350 रुपयांनी वधारले. तसेच आल्याची आवक व भाव स्थिर राहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)