कोथिंबीर महागली, पालेभाज्या तेजीत

पुणे- मागणी वाढल्यामुळे पालेभाज्यांचे भाव तेजीत आहेत. कोथिंबिरीच्या भावात शेकडा जुडीमागे 400 रुपयांनी वाढ झाली आहे. मेथी आणि कांदापात वगळता सर्व पालेभाज्यांच्या भावात 100 ते 200 रुपयांनी वाढ झाली आहे. मेथीचे भाव स्थिर आहेत. तर कांदापातच्या भावात मात्र, शेकडा जुडीमागे 200 रुपयांनी घसरण झाली असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली. रविवारी मार्केट यार्डातील तरकारी विभागात कोथिंबिरीची सुमारे दीड लाख जुडी, तर मेथीची 60 हजार जुडी आवक झाली. ही आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे. कोथिंबिरीच्या जुडीला घाऊक बाजारात 5 ते 10 रुपये भाव मिळत आहे. तर किरकोळ बाजारात 10 ते 20 रुपये भावाने विक्री होत असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली. पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : 500-1000, मेथी : 500-800, शेपू : 400-600, कांदापात : 400-600, चाकवत : 400-500, करडई : 400-500, पुदिना : 200-300, अंबाडी : 500-600, मुळे : 500-800, राजगिरा : 400-500, चुका : 400-700, चवळई : 400-600, पालक : 400-600.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)