कोथिंबीर जुडी अवघी रुपयाला

बाजारभाव नसल्याने पिकात सोडल्या मेंढ्या

सोमेश्‍वरनगर- आठवडे बाजारात कोथिंबीर जुडीला अवघा एक रूपये भाव मिळाला आहे. या भावामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने संतापलेल्या शेतकऱ्याने कोथिंबीर बाजारात आणण्याऐवजी उभ्या पीकातच मेंढ्या खाण्यासाठी सोडून सरकारच्या शेतीविषयक धोरणाराचा निषेध नोंदविला आहे.
बारामती तालुक्‍यात गेल्या चार-पाच वर्षांपासून अत्यल्प पाऊस असल्याने हा तालुका दुष्काळाचे चटके सोसतो आहे. त्यातही उपलब्ध पाण्यावर शेती करून तो आपला उदर्निवाह करीत आहे. मात्र, कोणत्याच पिकाला भाव नसल्याने तो मेटाकूटीस आला आहे. मध्यंतरी मेथी, कोथिंबीरीला चांगला भाव मिळाल्याने तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी याची लागवड मोठ्या प्रमाणात केली. हे पीक कमी कलावधीमध्ये व कमी पैशात येणारे असल्याने अनेकांनी घेतले. तर हे पीक जगवण्यासाठी कुपनलिका, विहिरीच्या पाण्यावर जगवली. तर फेब्रुवारी महिन्यात पडलेल्या कडाक्‍याच्या थंडीमुळे या पीकाला पोषक वातावरण मिळाले त्यामुळे उत्पादनात वाढ झाली, त्यामुळे चांगले उत्पन्न मिळेल अशी शेतकऱ्याला अशा होती. मात्र, बाजारभाव गडगडल्याने शेतकऱ्यांच्या आशेला सुरुंग लागला. कोथिंबीरीच्या जुडीला केवळ एकच भाव मिळाला. बाजारभाव नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी कोथिंबीर फेकून दिली तर जनावरांना खाद्य उपलब्ध होईल म्हणून काहींनी थेट कोथिंबीरीच्या शेतात मेंढ्या सोडल्या आहेत. जर शेतकरी जगवायचा असेल तर शेतपिकांना हमीभाव द्यावा, अशी माफक अपेक्षा सोमेश्‍वरनगरातील शेतकरी कुणाल गायकवाड यांनी केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)