संग्रहित छायाचित्र

पुणे- मागणी वाढल्यामुळे कोथिंबीर, कांदापत, चुका आणि चाकवतच्या भावात वाढ झाली आहे. कोथिंबीर, कांदापातच्या भावात शेकडा जुडीमागे प्रत्येकी 200 रुपयांनी, तर चुका, चाकवतच्या भावात प्रत्येकी 100 रुपयांनी वाढ झाली आहे. तर, दुसरीकडे आवक वाढल्यामुळे मेथीच्या भावात शेकडा जुडीमागे 100 रुपयांनी घट झाली आहे. उर्वरित सर्व पालेभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली. रविवारी येथील तरकारी विभागात कोथिंबीरीची गेल्या आठवड्याप्रमाणेच दीड लाख जुडी आवक झाली. तर मेथीची आवक वाढली असून, गेल्या आठवड्यात साठ हजार जुडी होती. ती आज 1 लाख जुडी झाली. कोथिंबिरीच्या जुडीला घाऊक बाजारात 5 ते 12 रुपये भाव मिळत आहे. तर किरकोळ बाजारात 10 ते 20 रुपये मोजावे लागत आहेत. पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : 500-1200, मेथी : 300-700, शेपू : 500-700, कांदापात : 500-800, चाकवत : 500-600, करडई : 400-500, पुदिना : 200-300, अंबाडी : 500-600, मुळे : 500-800, राजगिरा : 400-600, चुका : 500-800, चवळई : 400-600, पालक : 400-500.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)