कोथिंबिर, मुळा महागला. तर, मेथी कवडीमोल

पुणे- मार्केट यार्डात कोथिंबिर आणि मुळेची आवक घटली आहे. त्यामुळे दोन्ही भाज्यांच्या भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत शेकडा जुडीमागे 200 रुपयांनी वाढ झाली आहे. कोथिंबिरीच्या जुडीस घाऊक बाजारात 4 ते 8, तर किरकोळ बाजारात 10 ते 15 रुपये भाव मिळत आहे. दुसरीकडे मेथीची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत तिपटीहून अधिक झाली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात मेथीच्या भावात जुडीमागे 1 रुपयांनी घसरण झाली आहे. मेथीच्या जुडीस घाऊक बाजारात 3 ते 5 रुपये, तर किरकोळ बाजारात 10 रुपये मोजावे लागत आहेत. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्व पालेभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. रविवारी मार्केटयार्डातील तरकारी विभागात कोथिंबिरीची 1 लाख 20 हजार जुडी, तर मेथीची तब्बल 1 लाख 75 जुडी आवक झाली असल्याचे व्यापारी निखिल भुजबळ यांनी सांगितले. पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : 400-800, मेथी : 300-500, शेपू : 300-500, कांदापात : 500-800, चाकवत : 500-800, करडई : 400-600, पुदिना : 200-300, अंबाडी : 500-600, मुळे : 500-1000, राजगिरा : 500-600, चुका : 500-800, चवळई : 300-500, पालक : 300-400, हरभरा गड्डी : 500-800.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)