कोथरूडमध्ये हेल्मेटसक्ती विरोधात मतदान

कोथरूड – हेल्मेट सक्तीला विरोध दर्शवण्यासठी पतित पावन संघटनेच्या वतीने कोथरुड येथील भारती विद्यापीठच्या प्रवेशद्वारावर मतदान घेण्यात आले. यावेळी सीताराम खाडे, श्रीकांत शिळीमकर, पप्पु टेमघरे, संतोष शेंडगे, सुनिल मराठे उपस्थित होते. हेल्मेट सक्तीच्या माध्यमातून नागरिकांची एक प्रकारे पिळवणूक केली जात आहे. हेल्मेट उत्पादक कंपन्यांच्या फायद्यासाठी हा प्रकार चालू आहे, असा आरोप करत नागरिकांमध्ये जनजागृती करून हेल्मेट वापरण्याचे आवाहन करण्यापेक्षा सक्ती करून प्रशासन काय साध्य करत आहे, असा सवाल संघटनेचे शहरप्रमुख सीताराम खाडे यांनी यावेळी उपस्थित केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)