‘कोण म्हणतंय देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही’

राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसचे सभागृहात आंदोलन

पुणे – “पुण्याला पाणी मिळालेच पाहिजे’, “पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, “कोण म्हणतंय देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही’ अशी घोषणाबाजी करत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसने महापालिका मुख्यसभेत मंगळवारी घोषणाबाजी करत आंदोलन केले.

-Ads-

“आम्हाला शहरात पाण्याविना काय परिस्थिती आहे हे सांगायचे आहे. तुम्ही हुकुमशाही पद्धतीने वागू नका,’ असा आरोप करत “आम्हाला बोलायचे आहे,’ अशी मागणी दोन्ही पक्षांनी केली. “प्रत्येक वेळी पाण्यावर बोलायला संधी दिली आहे,’ असे महापौर म्हणाल्या. तसेच “उगाच आरोप करू नका,’ असेही त्यांनी आंदोलकांना सुनावले.

मनसेचे आंदोलन झाकोळले
कात्रज तलाव वाचवण्याबाबत वसंत मोरे आणि साईनाथ बाबर हे मनसे सदस्य पोस्टर घेऊन आणि अंगावर कृत्रिम वेल चढवून आंदोलनाच्या पवित्र्यात उभे राहिले. मात्र राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे आंदोलन सुरू झाले आणि त्यांचे आंदोलन झाकोळले गेले. नंतर तेही पाण्याच्या आंदोलनाच्या घोषणाबाजीत सहभागी झाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)