कोण कुणाला आडवं करत ते येत्या निवडणुकीत बघू – उदयनराजे भोसले 

जनतेला वाटलं तरच मी निवडणूक लढणार ! कारण जनता माझा पक्ष
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. राष्ट्रवादीमध्ये सातारा लोकसभा मतदार संघात उमेदवारीवरून जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. तसेच उदयनराजेंना एका गटाने उमेदवारी देण्यास विरोध केला.
उदयनराजे म्हणाले, मी  मंत्रालयात कामानिमित्त नेहमी येत असतो. दरम्यान, मी मुख्यमंत्री आणि इतर नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. तसेच “अनेक जण म्हणाले उदयनराजे नकोत कोणीही चालेल. अगदी मला आडवं करायचं चाललंय. कोण कुणाला आडवं करत ते येत्या निवडणुकीत बघू. जनतेला वाटलं तरच मी निवडणूक लढणार  कारण जनता माझा पक्ष असल्याचे उदयनराजे म्हणाले.
तसेच कुणाला वाटत असेल मी उदयनराजेंपेक्षा जास्त मतांनी निवडून येईल तर त्यांनी आकडे दाखवावे मी त्यांचा प्रचार करेल असे आवाहनही त्यांनी दिले आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
1 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)