कोण काय म्हणते याकडे पाहू नका

ललिता बाबर : घरच्यांनी संधी दिल्याने धावपटू बनले

रेडा- माझ्या घरच्यांनी मला संधी दिली म्हणून तर घरची हलाखीची परिस्थिती असताना क्रीडा क्षेत्रात दिला जाणारा अर्जुन पुरस्कार मिळवला. सर्वोत्कृष्ट धावपटू बनलो आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पालकांनी मुलांच्या आवडीनिवडीचे खेळ मनापासून खेळू द्यावे, त्यांच्यावर कोणतेही बंधन घालू नका. कोण काय म्हणते याकडे पाहू नका, असे आवाहन आशियातील सर्वोत्कृष्ट धावपटू व भारताची राष्ट्रीय विक्रमवीर ललिता बाबर यांनी केले.
इंदापूर तालुक्‍यातील मौजे लाखेवाडी येथील विद्यानिकेतन स्कूल ऍण्ड ज्युनियर कॉलेजच्या वतीने आयोजित विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बारामतीचे प्रांताधिकारी हेमंत निकम होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे यांचे खासगी सचिव दिलीप ढोले होते.
बाबर म्हणाल्या की, विद्यानिकेतन स्कूल ऍण्ड ज्युनिअर कॉलेजची स्थापना गेल्या सात महिन्यांत झालेली आहे. कमी कालावधीत थेट आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळले जाणारे विद्यार्थी घडवण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून झाले आहे. खेळामध्ये खऱ्या अर्थाने सरावाला महत्त्व असते. जरी मी भारताची धावपटू असली तरीदेखील मला प्लॅटफॉर्म लहानपणी मिळाला नव्हता. परंतु मात्र, गोरगरिबांच्या मुलांना यशस्वी मजल मारण्यासाठी ढोले कुटुंबीयांनी ही संधी निर्माण करून दिली आहे.
यावेळी स्टुडन्ट ऑलिम्पिक असोसिएशनच्या गोध्रा (गुजरात) येथे झालेल्या राष्ट्रीय थलेटिक्‍स स्पर्धेत सुवर्णपदक व रौप्यपदक मिळवून ऑस्ट्रेलिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या रोहन पंढरीनाथ ढोले व शिवांजली महेश रणवरे यांचा विशेष सन्मान बाबर यांच्या हस्ते करण्यात आला. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
अनेक शिक्षण सम्राटांच्या मोठमोठ्या शिक्षण संस्था पुणे जिल्ह्यामध्ये आहेत मात्र शिक्षण देण्याची पद्धती वेगळे आहे जे या शिक्षण सम्राटांना कळाले नाही ते थोड्याच दिवसात विद्यानिकेतन स्कूल मध्ये पाहायला मिळाले याचा आनंद कायम मनाला राहील. इंदापूर तालुका हा बागायती तालुका जरी असला तरी येथील पालकांना आपल्या विद्यार्थ्यांना राजकारणात न आणता शिक्षणामध्ये अध्यावत शिक्षण देऊन पुढे नेण्यासाठी प्रयत्न केला जावा यासाठी विद्यानिकेतन आगामी काळात उपयुक्त ठरेल असा आशावाद प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्याच्या राज्यकर उपायुक्‍त सुजाता ढोले व इंदापूर तहसिलदार सोनाली मेटकरी व कामधेनू सेवा परिवाराचे अध्यक्ष लक्ष्मणराव आसबे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले व मुख्य सल्लागार प्रदीप गुरव, मुख्य सचिव हर्षवर्धन खाडे यांनी स्वागत केले. संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी आभार मानले.

  • केवळ गोरगरिबांच्या मुलांना शिकण्यासाठी विद्यानिकेतन
    इंदापूर तालुक्‍यातील ग्रामीण भागात मुलांना मराठी माध्यमात बरोबर इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळत नसल्याने आमचे बंधू दिलीप राव ढोले यांच्या माध्यमातून विद्यानिकेतन स्कूल निर्माण करण्यात आले आहेत यामध्ये शालेय शिक्षणाबरोबर आपले जीवन यशस्वी करण्यासाठी दिले जाणारे अध्यावत शिक्षण चोरव दिले जाईल. तर आगामी काळात केवळ गोरगरिबांच्या मुलांना शिकण्यासाठी हे विद्यानिकेतन कार्य करेल असा शब्द संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले यांनी

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)