कोण आहे ही जसलीन मथारू ?

बिग बॉसच्या नवीन पर्वाची काल थाटामाटात  सुरुवात झाली. यामध्ये जेव्हा अनुप जलोटा त्याच्या जोडीदारासह आले त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्याचे कारणही तसेच होते. प्रसिद्ध भजनकार ६८ वर्षीय अनुप जलोटा यांचे त्यांच्या २८ वर्षीय शिष्या जसलीन मथारू हिच्यासोबत बिग बॉसच्या मंचावर आगमन झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली देखील दिली. सर्व बिग बॉस प्रेमींना हा प्रश्न पडला कि कोण आहे ही जसलीन मथारू ?

कोण आहे जसलीन ?

जसलीन चा जन्म मुंबईमध्ये झाला.तिचे जास्तीत जास्त आयुष्य देखील मुंबईमध्येच गेले.  ती २८ वर्षांची असून व्यवसायाने अभिनेत्री आणि संगीतकार आहे. तिचे वडील  देखील अभिनेते, संगीतकार आणि दिग्दर्शक आणि कथालेखक असून जसलीनला या क्षेत्रात येण्यास त्यांच्याकडूनच प्रेरणा मिळाली.

ती काही म्युसिक व्हिडिओच्या माध्यमातून प्रसिद्धीच्या झोतात आली होती. तिने प्रसिद्ध गायक मिका सिंग यांच्यासाठी तब्बल ३ वर्षे गाणी गायली. त्याचबरोबर तिने सुखविंदर सिंग, मिका सिंग आणि प्यापोन यांच्यासोबत देखील काम केले आहे.

जसलीनचे  कौशल्य फक्त गायकी आणि कलाकारीपुरते मर्यादित नसून  तिने किक – बॉक्सींगमध्ये  देखील प्राविण्य मिळवले आहे. ती किक – बॉक्सींगमध्ये ब्राऊन बेल्ट आहे आणि मागील ७ वर्षांपासून सर्व करत आहे. त्याचबरोबर तिने भरतनाट्यम, सालसा, बेली डान्स आणि हिप होपचे देखील प्रशिक्षण घेतलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)