कोणीही चोरटी वाळू वाहतूक करू नये

गौण खनिज संघटनेचा निर्णय ः नियमबाह्य वाहतूक करणाऱ्यांना पकडून देणार

नगर – गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाने अवैध गौण खनिज वाहतूकदारांवर कारवाई सुरू केली आहे. शासकीय नियमानुसार वाहतूक करावी, यासाठी कारवाई चालू केली आहे. या कारवाईस संघटनेचा पाठिंबा आहे. यापुढील काळात नियमबाह्य वाहतूक करणाऱ्यांना अ.नगर शहर तालुका गौण खनिज संघटनेच्या माध्यमातून पकडून देण्यात येणार आहे.

अ.नगर शहर तालुका गौण खनिज संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी संप सुरू असून, या पार्श्‍वभूमीवर बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शंकर पवार, राजेंद्र पठारे, कृष्णा लांडे, शंतनु पांडव, सचिन सप्रे, भैय्या भोर, अण्णा धाडगे, विशाल फाळके, सागर शिंदे, रिजवान खान, आसीर पठाण, शैलेश सुंबे, बाबासाहेब दांगट यांच्यासह संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

शासकीय नियमात वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करू नये, 2 ब्रास गौण खनिज वाहतूक करण्यास संघटनेच्या सदस्यांची तयारी आहे, छोट्या-मोठ्या बांधकामदारांना 1 ब्रास वाळू लागते, त्यासाठी छोट्या गाड्यांनी वाहतूक करावी लागते. त्या वाहतुकीस शासनाने परवानगी द्यावी, मुरूमाची रॉयल्टी मिळणेबाबतची जाचक अट रद्द करून पूर्वीप्रमाणे परमिट परवाना मिळावा, अनधिकृत गौण खनिजाची खरेदी केल्यास शासकीय कर्मचाऱ्यांनी रॉयल्टीची मागणी केल्यास त्यास संघटना जबाबदार राहणार नाही.

कोणीही चोरटी वाळू वाहतूक करू नये, असे आवाहन अ.नगर शहर तालुका गौण खनिज संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप चालू राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)