कोणालाही उत्तर देण्याची गरज वाटत नाही -पुजारा

मेलबर्न: धावा करणे हे माझे कामच आहे. मैदानात खेळताना मला टीका कारांना उत्तर देण्याची गरज वाटत नाही. असे वक्तव्य ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत शतक झळकावल्यानंतर बोलताना भारतीय संघातील मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्‍वर पुजाराने केले आहे.

मी मैदानावर गेलो की केवळ जास्तीत जास्त धावा कशा जमवता येतील याकडे लक्ष देत असतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना कोणाचेही तोंड बंद करणे हे माझे काम नसून केवळ संघासाठी धावा करणे हेच मी माझ काम मानतो आणि हेच काम मला आवडते. चाहते काही वेळा माझ्यावर टीका करतात. त्या टीकांना उत्तर देणे हे मला आवडत नाही. मी माझ्या चुका कमी करून खेळ सुधारण्याकडे लक्ष देतो. मायदेशी असो किंवा परदेशात असो, मी धावा करत राहिलो आणि भारत जिंकत राहिला, तर माझ्या खेळीचा उपयोग होईल असेही तो म्हणाला.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)