कोणत्याही स्थितीत पुणेकरांना पाणी कमी पडणार नाही

पुणे – जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाच्या पाण्याच्या निकालानंतर महापालिकेने पाणी कपात करावी, यासाठी जलसंपदा विभाग आग्रही आहे. त्यासाठी पाण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने सुरू केले आहे. मात्र, “पुणेकरांना कोणत्याही स्थितीत पाणी कमी पडून दिले जाणार नाही,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. यामुळे पाणीकपातीमुळे त्रस्त झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

बुधवारी पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या मुख्यमंत्र्याची महापालिका पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. यावेळी शहरातील विकासकामे, तसेच शहराच्या प्रश्‍नांबाबत माहिती घेतली. महापौर मुक्‍ता टिळक यांच्यासह सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी मुख्यमंत्र्याशी चर्चा केली. पदाधिकाऱ्यांनी पाणीप्रश्‍नी तोडगा काढण्याचे साकडे घातले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कालवा समिती बैठकीत शहराला 1,350 ऐवजी 1,150 एमएलडी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पाटबंधारे विभागाने खडकवासला धरणावर जात पाणी पुरवठ्याचे पंप पोलीस बंदोबस्तात बंद केले. त्यानंतर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. त्यानंतरही जादा पाणी सोडण्यास पाटबंधारे विभागाने नकार दिल्याने महापालिकेने अखेर पाणीकपातीचा निर्णय घेतला. त्यानंतर पुन्हा जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने “महापालिकेस वर्षाला 8.19 टीएमसी पाणी द्यावे’, असा निर्णय दिला. तर, शासनाने “महापालिकेस वर्षाला 11.50 टीएमसी पाणी द्यावे, असा करार असल्याने त्यानुसारच पाणी वापरावे,’ असे पत्र पाठविले. त्यामुळे पुन्हा एकदा पाणीकपात वाढण्याची शक्‍यता होती. मागील आठवड्यातही पुण्यात आलेल्या जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी महापौर बंगल्यावर बैठक घेऊन महापालिकेने पाणीकपात करावी, अशी सूचना केली होती. त्यामुळे पाणीकपात वाढण्याची शक्‍यता होती. मात्र, आता मुख्यमंत्र्यांनीच लक्ष दिल्याने भाजप पदाधिकाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)