सध्या सर्वच संघ अपयशी, मग आमचीच चर्चा का? असा संतप्त सवाल
ब्रिस्बेन- भारतीय संघाला विदेश दौऱ्यात नेहमीच अपयशाला सामोरे जावे लागते. त्यामुळे भारतीय संघावर सातत्याने टिका होत असून भारतीय संघाला केवल घरके शेर असे संबोधले जात असल्याने संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री संतप्त झाले असून सध्या कोणत्याही संघाला विदेश दौऱ्यात आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता येत नाहीये मग फक्त भारतीय संघाचीच चर्चा का करत आहात असा सवाल ही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
भारतीय संघाने 2018 मध्ये दोन मालिका गमावल्या त्यात दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दौऱ्यांचा समावेश होता. आफ्रिकेत भारताला 2-1 असा पराभव स्विकावारा लागला होता. तर, इंग्लंडमध्ये 4-1 असा एकतर्फी पराभव पत्करावा लागला. या दोन्ही दौऱ्यावर भारतीय संघाने पराभव पत्करल्यानंतर भारतीय संघाच्या विदेशी भूमीतील कामगिरीबद्दल पुन्हा चर्चा होउ लागल्याने भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री संतापले असून त्यांनी सध्या इतर संघ देखिल अपयशी ठरत असताना सर्वजण केवळ भारतीय संघाच्या अपय्शाबद्दलच का चर्चा केली जाते असेही त्यांनी यावेळी विचारले.
यावेळी या संदर्भात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाची कामगिरी कशी होईल, याबाबत विचारले असता शास्त्री म्हणाले, चुकांमधुनच आपल्याला शिकायचे असते. परदेशात फार कमी संघांना चांगली कामगिरी करता आलेली आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांनी अशी कामगिरी केलेली आहे. या दोन संघांव्यतिरिक्त परदेशात कोणत्या संघाला चांगली कामगिरी करता आली आहे का? मग, भारतीय संघालाच का टार्गेट केले जातेय. आफ्रिका आणि इंग्लंड दौऱ्यातील कामगिरीवर कर्णधार विराट कोहलीने खेळाडूंशी चर्चा केली आहे का, यावर शास्त्री म्हणाले, त्या दौऱ्यांत आम्हाला बरच काही शिकायला मिळाले. मिळालेली संधी सोडता कामा नये. आम्ही विजयाच्या जवळ आलो होतो, परंतु त्या संधीचे सोने करता आले नाही. त्यामुळे आम्हाला कसोटी मालिका गमवावी लागली होती.
गेल्या काही काळापासून ऑस्ट्रेलियाचा संघ बॅडपॅच मधून जात आहे. त्यांना चांगली कामगिरी करताना अपयश आलेले आहे. याचा आम्हाला निश्चीतच फायदा होइल असे मला वाटते. मात्र, प्रत्येक संघ आपल्या घरच्या मैदानावर सशक्त असतो. त्यामुळे प्रत्येक संघ घरातल्या मैदानात चांगली कामगिरी करत असतोच त्यामुळे केवळ भारतीय संघालाच लक्ष्य केले जात आहे.
या मालिके पूरते बोलायचे झालेच तर, या मालिकेत आम्ही सर्व शक्तीनिशी उतरणार आहोत. आमचे गोलंदाज या मालिकेत चांगली कामगीरी करतील आम्हाला अपेक्षा आहे. कारण, ऑस्ट्रेलियामधिल खेळपट्ट्याया वेगवान गोलंदाजांना साथ देणाऱ्या आहेत. आणि आमच्याकडे सध्या चांगले वेगवान गोलंदाज आहेत याचा आम्हाला निश्चीतच फायदा होणार आहे असेही त्याने यावेळी सांगितले.
मैदानावरिल खेळ महत्वाचा
भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ मैदानावरील आपली वागनूक कशी राहिल याबाबत बोलताना दिसत आहे. त्याबद्दल बोलताना रवी शास्त्री म्हणाले आहेत की, मैदानावरील खेळातून विजय मिळवने महत्वाचे आहे. तुम्ही मैदानात खेळा व्यतिरीक्त काय करता हे महत्वाचे नसते असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, स्टिव्ह वॉच्या काळात त्यांचा संघ स्लेजिंगच्या माध्यमातून विरोधी संघाला हैरान करुन सोडायचे. मात्र, डेव्हिड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथयांच्या बॉल टॅम्परिंगच्या प्रकरणानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघ मवाळ भुमीकेत आला आहे. मात्र, भुमीका महत्वाची नसून त्यांचा मैदानावरील वावर महत्वाचा आहे तोच वावर त्यांना विजय मिळवून देऊ शकतो असेही त्यांनी यावेळी सांगितले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा