कोणत्याही विद्यापीठाने गांधी अध्यासन सुरू केलेले नाही

नवी दिल्ली – विद्यापीठ अनुदान आयोगाने गांधी अध्यासन सुरू करण्याची देशातील विद्यापीठांना नव्याने अनुमती देऊनही कोणत्याही विद्यापीठाने अद्याप गांधी अध्यासन सुरू केलेले नाहीं अशी माहिती मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली. विद्यापीठांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी आणि त्यांच्यात मुल्य वृद्धी करण्यासाठी ख्यातनाम व्यक्तींच्या नावांनी अध्यासने सुरू करण्यास विद्यापीठ अनुदान आयोगाने अनुमती दिली आहे.

शांतता आणि अहिंसा या तत्वांचा पुरस्कार करण्यासाठी महात्मा गांधी यांच्या नावानेही अध्यासन सुरू करण्याची अनुमती या आयोगाने दिली आहे. तथापी त्यांच्या नावाने अध्यासन सुरू करण्यासाठी एकही प्रस्ताव विद्यापीठ अनुदान आयोगाकडे आलेला नाही असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.

तथापी अनेक विद्यार्थ्यांमध्ये गांधींचा अभ्यास करण्याची रूची आहे. एमफिल आणि पीचडीसाठीही अनेकांनी गांधींच्या विचारांवर अभ्यास करण्यासाठी आपली नाव नोंदणी केलेली आहे.गांधींच्या अभ्यासासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे पदव्युत्तर प्रोग्रॅमध्ये सन 2017-18 या वर्षात एकूण 419 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहितीही त्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)