कोणतेही पद सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठीच 

उपमहाराष्ट्र केसरी बबन काशीद : नान्नजला शहाजी राजेभोसले यांचा सर्वपक्षीय सत्कार
जामखेड – सत्ता हे सेवेचे साधन आहे. त्याच्या पदाचा वापर सर्वसामान्य जनतेचे प्रश्‍न सोडविण्यास करावा. कर्तव्यापेक्षाही सेवा भावनेने काम करा, असे प्रतिपादन उपमहाराष्ट्र केसरी बबन काशीद यांनी केले.
जामखेड तालुक्‍यातील नान्नज येथे नवनिर्वाचित शिवसेना तालुकाप्रमुख शहाजी राजेभोसले यांचा सर्वपक्षीय सत्कार समारंभ पार पडला. त्यावेळी काशीद बोलत होते. यावेळी शिवसेनेचे बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळुक, युवक कॉंग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष चिंतामणी जगताप, कॉंग्रेसचे कर्जत तालुकाध्यक्ष बाळासाहेब सांळुके, बीड भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल गलधर, माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर राळेभात, जामखेड नगरपरिषदेचे नगरसेवक पवन राळेभात, दिगंबर चव्हाण, अमित जाधव, भाजप गटप्रमुख संतोष पवार, बोर्ले गावचे सरपंच भारत काकडे, धोंडपारगाव सोसायटी अध्यक्ष राजेश जाधव, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख संतोष वाळुंजकर, ग्रामपंचायत सदस्य सचिन मलंगनेर, ऍड. अल्लाउद्दीन शेख, मराठा महासंघाचे अध्यक्ष दत्ता शिंदे, जवळके ग्रामपंचायतीचे उपसरपंच बब्रुवान वाळुंजकर, पप्पू जगताप, अप्पा मोहळकर, दत्ता पाचारणे, राहुल उगले, प्रकाश रजपूत, आबा साळुंके, सागर गवसणे यांच्यासह परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रस्ताविक सचिन मलंगनेर यांनी केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित शिवसेना तालुकाप्रमुख शहाजी राजेभोसले यांचा सत्कार करण्यात आला. काशीद म्हणाले की, प्रत्येकाने आपणास मिळालेल्या पदाचा वापर गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी करा. गेली अनेक वर्षापासून शहाजी राजेभोसले राजकारणात सक्रिय आहेत. त्यांना मिळालेले पद हे मोठे आहे. राजे यांनी सामान्यातल्या सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात.सूत्रसंचालन सचिन मलंगनेर यांनी केले. राहुल उगले यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)