कोणतीही परिक्षा न देता पोलिस भरतीत अव्वल !

संग्रहित छायाचित्र

पोलीस भरतीमध्ये मेरीटमध्ये पास करणाऱ्यांचे एक रॅकेट उद्‌वस्त

औरंगाबाद: पोलिसात भरती होण्यासाठी कोण-कोण काय करेल हे सांगता येत नाही. त्याचे अनेक उदाहरणे मागच्या अनेक दिवसांपासून उघड झाले आहेत. आता तर औरंगाबाद पोलीसांनी ना शारिरीक, ना लेखी परिक्षा तरीही पोलीस भरतीमध्ये मेरीटमध्ये पास करणाऱ्यांचे एक रॅकेट उद्‌वस्त केले आहे. पोलिसांनी तरुणांची एक टोळी जेरबंद केली आहे. या उच्चशिक्षीत तरुणांनी अख्या ठाणा पोलीसांना गंडवले आहे. यातील तेजराव साबळे आणि भारत रुपेकर हे दोन तरुण, कोणतीही शारिरीक किंवा लेखी परिक्षा न देता ठाणे आयुक्तालयात पोलीस भरती प्रक्रीयेत अव्वल आले आहेत. हे सर्व तरूण औरंगाबाद शहराजवळील काद्रांबाद गावातील आहेत.
तेजराव साबळे आणि भारत रुपेकर यांनी ठाणे आयुक्तालयात पोलिस भरतीसाठी अर्ज केला. तेजराव साबळे यांनी शारिरीक चाचणीसाठी झनक चरांडेला उभा केले, तर लेखी परिक्षा राजू नागरे नावाच्या तरुणाने दिली. तर भारत रुपेकर याची शारिरीक चाचणी वाहब नवाब शेखने, तर लेखी परिक्षा दत्ता नलावडेने दिली. यासाठी शारिरिक चाचणी देणाऱ्या तरुणांना प्रतेकी 1 लाख मिळाले, तर लेखी देणाऱ्या तरुणांना साडेतीन लाख मिळाले. या तरुणांच्या टोळक्‍याने यासाठी अत्याधुनीक यंत्रणेचाही वापर केला. यातील लेखी परिक्षा देणारे दत्ता नलावडे आणि राजू नागरे हे एमपीएससी परिक्षेची तयारी करणारे तरुण आहेत. यातील भारत रूपेकर नावाचा तरूण फरार आहे पोलीस खात्यात कुठलीही शारिरीक चाचणी, लेखी परिक्षा न देता पोलीस भरतीमध्ये अव्वल येण्याचे यश मिळवणाऱ्या या तरुणाच्या पराक्रमामुळे, ठाणे पोलीसही संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. कारण हे डिवाईस आणि मोबाईल परिक्षा केद्रांपर्यंत पोहोचला कसा? शारिरिक चाचणी, लेखी परिक्षा देताना वेगवेगळे अमेदवार आले कसे? त्यांचे आयकार्ड कसे तयार झाले? याच ठाणे पोलीसातील काही अधीकारी यांच्यासोबत सहभागी आहेत का? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.  दिवंगत नेते आर.आर.पाटील यांनी पोलीस भरती प्रक्रीया पारदर्शक केली. त्यामुळे ग्रामीण भागातील कष्टकरी मुले पोलीसात भरती झाली. मात्र या उच्च शिक्षित तरुणांनी त्यातही गैरमार्ग शोधलाच आणि त्याचमुळे त्यांच्या हातात बेड्या आहेत. मुंबईतही डमी परिक्षार्थी उभा केल्याने औरंगाबादच्या एका तरुणाला अटक केली आहे. त्यामुळे या तरूणांच्या टोळक्‍याने आणखी किती मुले अशाप्रकारे पोलीस खात्यात घुसवली आहेत, यांचा औरंगाबाद ग्रामीण पोलीस शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)