कोणताही पात्र लाभार्थी धान्य मिळण्यापासून वंचित राहणार नाही- गिरीश बापट

मुंबई – रास्तभाव दुकानांमधून धान्य घेणाऱ्या कोणत्याही पात्र लाभार्थ्यांना धान्य मिळण्यापासून वंचित ठेवलं  जाणार नसल्याचं अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी स्पष्ट केले.बापट यांनी यावेळी बोलताना सांगितले की, कोणताही पात्र लाभार्थी धान्य मिळण्यापासून वंचित राहू नये यासाठी संबधितांना सूचना दिल्या आहेत.

यानुसार, रास्तभाव दुकानातील पॉस  मशीनद्वारे कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याचे आधार ऑथेंटिकेशन झाले तरी त्या कुटुंबाला धान्य वितरण केले जाणार आहे. आधार ऑथेंटिकेशन झाले नसल्यास ई-केवायसी  करुन घेतल्यास धान्य वितरण होणार आहे. आधार सिडींग नसलेल्या सदस्यांचे  ई-केवायसीच्या माध्यमातून, धान्य वितरण होईल. हे तीनही पर्याय शक्य नसल्यास Route Nominee च्या आधार ऑथेंटिकेशनच्या आधारे धान्य वितरण करता येणार असल्याचं त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)