कोणताही निर्णय घ्यायला ‘ते’ मोकळे आहेत – नितीशकुमार

नवी दिल्ली : बिहारमध्ये एनडीए सरकार बनल्यानंतर जनता दलाचे (यु) अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार   यांनी पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी, येत्या ऑगस्टमध्ये पंतप्रधान मोदींसोबत आपली पुन्हा भेट होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पक्षाचे माजी अध्यक्ष शरद यादव यांच्याबाबत पत्रकारांनी विचारताच, शरद यादव यांना कोणताही निर्णय घ्यायचे स्वातंत्र्य असल्याचे नितीश कुमार म्हणाले. दरम्यान, जनता दलाने शरद यादव यांना राज्यसभेच्या पक्षनेतेपदावरून हटविण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या वतीने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना तसे पत्रही देण्यात आले आहे.  पक्षाने शरद यादव यांच्याऐवजी आरसीपी सिंह यांना राज्यसभेचा नेता केले आहे. जनता दलाच्या ७ राज्यसभा आणि दोन लोकसभा खासदारांसोबत पक्षाचे राष्ट्रीय महासचिवर संजय झा यांनी सकाळी दहा वाजता उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली. तसेच, या वेळी चर्चा करताना सिंह यांना राज्यसभेतील पक्षनेता केल्याबाबतचे पत्रही दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)