‘कोणताही नागरिक कोठेही जाऊ शकतो ; राज ठाकरेंनी हे राजकारण बंद करावे’

महाराष्ट्रातील अनेक नागरिक देशासह परदेशात रोजी-रोटीसाठी फिरत आहेत. त्यांच्या संरक्षणाचे काय?

नगर: अहमदनगर आणि धुळे महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आमदार आबू आझमी हे नगर दौऱ्यावर आहेत. यानिमित्ताने नगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविणारे उमेदवार यावेळी उपस्थित होते. दरम्यान त्यांनी एमआयएम’सह  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या राजकारणावर आबू आझमी यांनी टिका केली.

राज ठाकरे हे मुंबईत मतांसाठी उत्तरप्रदेशमधील रहिवाशांच्या व्यासपीठावर गेले आहे. ही सुरूवात आहे. देशातील कोणताही नागरिक रोजी-रोटीसाठी कोठेही जाऊ शकतो. त्याला संविधानाने तसा अधिकार दिला आहे. महाराष्ट्रातील अनेक नागरिक देशासह परदेशात रोजी-रोटीसाठी फिरत आहेत. त्यांच्या संरक्षणाचे काय? राज ठाकरे यांनी हे राजकारण बंद करावे. भाजपने सुरू केलेल्या राजकारणावर त्यांनी दबाव आणावा. नरेंद्र मोदी धर्माच्या नावावर जे संविधान बदलण्याचा घाट घालत आहेत, त्याला विरोध करावा. त्याच्याविरोधात संघर्ष करावा. तिथे मात्र ते मौन बाळगतात. हे मतलबी राजकारण त्यांनी थांबवावे, असे आबू आझमी यांनी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)