कोठल्यात जुगार अड्डयावर पोलीसांचा छापा

नगर – कोठला झोपडपट्टीत जुगार अड्डयावर अतिरिक्त पोलीस अधिक्षक डॉ.अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकण्यात आला आहे.

पोलीसांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून कोठला परिसरात सापळा रचून जुगार अड्डयावर छापा टाकत 10 जुगाऱ्यांना अटक करण्यात आली. गणेश दिलीप कानडे, शेख रफिक नवाब, जाकिर शेख, जलील शेख, शेख मुसा, शेख असिफ रफिक (सर्व राहणार कोठला ), शेख जावेद लालमियॉं, शेख दिलदार जाफर (रा.मुकूंदनगर ), रमेश ठाणगे, (रा.गंजबाजार ), विठ्ठल निवृत्ती दरेकर (रा. हिरडगाव ता.श्रीगोंदा ), शेख शब्बीर नसीब (रा.बेलदारगल्ली ) या जुगाऱ्यांना अटक करण्यात आले असून त्यांच्या कडून 68 हजार 890 रुपयांची रोक्कड जप्त करण्यात आली. या पथकात पोहेकॉ. सुयोग सुपेकर, युवराज गिरवले, पोना. गणेश चव्हाण, प्रमोद जरे, रंगनाथ नरसाळे, सागर स्वारके आदी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)