कोठडीत पोलिसांनी केली मारहाण

न्यायालयात अरुण फरेरा यांचा आरोप 

पुणे – बंदी घातलेल्या माओवादी संघटनांशी संबंध असल्याच्या कारणावरून अटक करण्यात आलेल्या अरुण फरेरा यांनी पोलीस कोठडीत गुन्ह्याचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्‍त शिवाजी पवार यांनी मारहाण केल्याची तक्रार न्यायालयात केली. विशेष न्यायाधीश आर. व्ही. आदोने यांच्या न्यायालयात ही तक्रार करण्यात आली. दरम्यान पोलीस कोठडी अबाधित ठेवून फरेरासह तिघांना 19 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

अरुण फरेरा, सुधा भारद्वाज, वरनॉन गोन्सालविस यांना 6 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मंगळवारी पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी फरेरा यांनी पोलिसांविरुद्ध मारहाणीची तक्रार केली. त्यामध्ये दि. 4 नोव्हेंबर रोजी स्वारगेट येथील एसीपी कार्यालयात नेण्यात आले. त्यावेळी कार्यालयात एकटेच असलेल्या शिवाजी पवार यांनी मारहाण केल्याचा आरोप केला. पवार यांनी फरेरा यांचा चश्‍मा काढून 10 ते 12 चापटी गालावर मारून तोंड सुजविल्याची तक्रार केली. या तक्रारीवर जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी म्हणणे मांडण्यासाठी वेळ मागितला. फरेरा यांचे वकील सिद्धार्थ पाटील यांनी ससून रुग्णालयाने दिलेले रिपोर्टमध्ये पोलिसांकडून फेरफार होण्याची शक्‍यता लक्षात घेता ते रिपोर्ट न्यायालयाकडेच ठेवण्याची मागणी केली. त्यावर न्यायालयाने सरकारी वकिलांना म्हणणे सादर करू द्या, असे सांगितले.

दरम्यान सुधा भारद्वाज यांनी कपडे, पुस्तके आणि त्यांना जी नियमित औषधे लागतात, ती न्यायालयीन कोठडी दरम्यान मिळण्याची मागणी केली. वरनॉन गोन्सालविस यांनी माझ्यावर ससूनमध्ये उपचार करण्यात आले आहेत. त्याचे मला वैद्यकीय अहवाल मिळावेत अशी मागणी केली. दरम्यान फरेरा यांचे म्हणणे न्यायालयाने इनकॅमेरा नोंदविले. बचाव पक्षाच्या वतीने अॅड. सिद्धार्थ पाटील, अॅड. रागिनी अहुजा, अॅड. प्रताप विटणकर यांनी बाजू मांडली

…या कारणासाठी करण्यात आली न्यायालयीन कोठडीची मागणी
गुन्ह्याचा अद्याप तपास सुरू आहे. न्यायवैद्यक प्रयोगशाळा यांच्याकडून क्‍लोन कॉपी आणि अहवाल येणे बाकी आहे. त्या माहितीच्या आधारे तपास करावा लागणार आहे. वर वराराव, गौतम नवलाखा, आनंद तेलतुंबडे आणि यापूर्वी अटक केलेल्या संशयित आरोपींकडे समोरासमोर तपास करायचा आहे. त्यामुळे फरेरा, गोन्सालविस, भारद्वाज यांची गरज भासल्यास पोलीस कोठडीचे हक्क आबाधीत ठेवून न्यायालयीन कोठडीची मागणी करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)