कोठडीतील दुर्गंधीबाबत अॅड. गडलिंग यांची तक्रार

पुणे – बंदी घातलेल्या माओवादी संघटनांशी संबंध असल्याच्या कारणावरून न्यायालयीन कोठडीत असलेल्या अॅड. सुरेंद्र गडलिंग यांनी मंगळवारी न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयीन कोठडीतील अस्वच्छतेबाबत पुन्हा तक्रार केली आहे. दुर्गंधीमध्ये तीन-तीन तास ठेवत असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष न्यायाधीश किशोर वडणे यांच्या न्यायालयात हे सांगितले.

एल्गार प्रकरणात अटक करण्यात आलेले अॅड. सुरेंद्र गडलिंग यांचा स्वतःच्याच जामिनावर युक्तीवाद होणार होता. परंतु, ही सुनावणी 15 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. न्यायालयात अॅड. गडलिंग यांच्या सोबत बोलत असलेले वकील अॅड. निहालसिंग राठोड यांना न्यायालयाच्या परवानगी शिवाय अॅड. गडलिंग यांच्या बरोबर बोलू नका, असे सांगितले. तसेच बोलायचे असेल तर, वकीलपत्र दाखल करा असे म्हणाले. त्यावर अॅड. गडलिंग यांनी न्यायालयाकडे अर्ज सादर करून अॅड. राठोड असिस्ट करतील, अशी परवानगी घेतो असे सांगितले. तशी अर्ज दाखल करून परवानगीही मिळवली.

-Ads-

दरम्यान, याप्रकरणात 15 नोव्हेंबर रोजी अॅड. गडलिंग स्वतः त्यांच्या जामिनावर युक्तीवाद करणार आहेत. महेश राऊत, रोना विल्सन आणि सुधीर ढवळे यांच्या जामिनावर 16 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)