कोट्यवधीची उलाढाल, पण नियोजनाचा फज्जा

म्हसवडला आलेल्या भाविकांची गैरसोय

म्हसवड – म्हसवड येथे सिद्धनाथ यात्रेत पाच लाखांहून भाविकांनी हजेरी लावली. यात्रेत कोट्यवधीची उलाढाल झाली असली तरी पालिका प्रशासन, वीज मंडळ, सातारा लातूर रस्ता कामातील ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामचुकारपणामुळे भाविकांची गैरसोय झाली. यात्रा नियोजन बैठकीत नागरिकांनी सुचवलेली कोणतीच कामे कोणत्याच विभागाने केली नाहीत. या बैठकीचा अधिकाऱ्यांनीच फज्जा उडवल्याने यात्रा नियोजन बैठक म्हणजे नुसता फार्स ठरला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरवर्षी यात्रा नियोजनाची दोन वेळा बैठका घेऊन शहरातील नागरीकांच्या नागरी सुविधाचा ऊहा पोह केला जातो प्रत्यक्षात मात्र पालिका ना नागरी सुविधा देते ना यात्रेसाठी आलेल्या नाथ भक्ताना सुविधा पुरवते यात्रा म्हटले की प्रत्येकांच्या घरी किमान दहा तरी पै पाहुणे मित्र नातेवाईक ओळखीने येणारी मानसे आसतात त्या दहा मानसाना पाच सहा दिवसातुन येणारे पाणी कसे पुरवणार ग्रामस्थ पुरवणार यात्रा काळात दोन दिवस सकाळ संध्याकाळ पाणी पुरवठा केला असता तर पाणी टंचाई जानवली नसते किंवा पालिकेचे दोन टॅंकरने जरी शहरात, यात्रा पटांगणात पाणी पुरवठा केला आसता भाविकांना आंघोळीचे पाणी विकत घेण्याची वेळ आली नसती.

सुदैव म्हणुन तालुक्‍याचे नेते शेखरभाऊ गोरे यांनी म्हसवड यात्रेतील भाविकांची पाण्यासाठी गैरसोय होऊ नये म्हणुन पिण्याच्या पाण्याचे दोन टैंकर यात्रेच्या आधी दोन दिवसापासुन भाविकांना पाणी पुरवत होते तर यात्रा काळात कोणता अनुचित प्रकार घडू नये म्हणुन एक अैंब्युलन्स दिवस रात्र यात्रा पटांगणावर तैनात होती जे काम प्रशासनाने करणे गरजेचे होते ते काम शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठान चे कार्यकर्ते करत होते

यात्रे दरवर्षी पंढरपुर येथील दोन मोबाईल टॅंयलेट पालिका मागणी करते त्या प्रमाणे किमान पाच दिवस यात्रा पटांगण व बाजार पटांगण येथे उभे केले जात होते. यावर्षी मात्र पालिकेने मोबाईल टॅंयलेटच मागवली नसल्याने स्वच्छ भारत अभियान स्पर्धेत मोठा गाजा वाजा करत उतरलेल्या पालिकेचे यात्रा पटांगणानजिकचे रस्ते, नदी पात्र घाण झाले आहे, तर अत्यावश्‍यक सेवा म्हणुन अग्निशमन कडे पाहिले जाते.

दरवर्षी विटा रहिमतपूर येथील अग्निशमन यात्रेनिमित्त बोलवले जातात यावर्षी बाहेरील एकही अग्निशमन बोलवली नाही शहरातील रस्त्यावरचे खड्डेही साधे मुजवले नसल्याने यात्रे बाबत पालिका पदाधिकारी व प्रशासनाने शहर वासियांच्या भावनेसी खेळण्याचे काम यात्रेत केले

यात्रेत दोन दिवस चोवीस तास लाईट देण्याची भाषा करणाऱ्या विज मंडळाने यात्रेत दहा नवीन ड्रान्सफार्म बसवून व सर्व लाईन दुरुस्ती करण्याची बैठकीत सांगीतले मात्र या पैकी किती कामे केली हे म्हसवड विज वितरणचे अभियंत्ता यांनाच माहित कारण यात्रे पूर्वी दोन दिवस दहा मिनिटे ही लाईट टिकत नव्हती ग्राहकानी लाईटची चौकसी केली असता काम चालू आहे येईल दहा मिनिटात असे सांगीतले जाते मात्र प्रत्यक्षात ऐन यात्रेत लाईट बिल थकीताची वसुली यात्रेत केल्याने लाईटची बोबाबोब झाली.

 

बांधकाम विभागाने म्हसवडकडे येणारे शिंगणापूर भाटकी देवापुर विरकरवाडी पुळकोटी आदी रस्त्यावरील खड्डे भरले नाहीत साईडपट्ट्या केल्या नाहीत झाडे झुडपेही तोडली नाहीत नियोजन बैठकीत बोल घेवड्याची भुमिका घेणाऱ्या बांधकाम अधिक्षक व अभियंत्यानी काम चुकारपणाचा कळस केल्याने यात्रेत रस्त्याचीच बोबाबोब होती तर लातुर हायवेचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराने येणाऱ्या भाविकांना रस्ता दुरुस्त न करता जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला ठेंगा दाखवल्याने यात्रेला येणाऱ्या अनेकांना वाहन चालवताना जिव मुठीत घेवून यावे लागले तरी हि अनेक मोटार सायकली चार चाकी घसरण्याचे प्रकार झाल्याने ठेकेदाराला किती गाभिर्य आहे हे दिसत होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)