कोट्यधीश होण्याचा मॅकेंन्झी फंडा

काही दिवसांपूर्वी कोट्याधीश होण्याच्या काही मार्गांची चर्चा केली होती. मात्र ॲमेझॉनचे मालक श्री.जेफ बिझॉज आणि त्याच्या धर्मपत्नी सौ. मॅकेंन्झीं यांच्या विवाहविच्छेदाच्या(Divorce) बातमीमुळे मला त्यात थोडासा बदल करावा लागेल असे दिसते…

अरे हो..आधी कोट्यधीश होण्याचे ते मार्ग आपण पाहू. मी लिहिले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

माझ्या सर्व तरुण समुह सदस्यांनो, आयुष्यांत करोडोपती (कोटी….एकावर सात शून्ये) कसे व्हावे याचे काही हमखास आणि सोपे उपाय मी तुम्हांला सांगणार आहे.

१) एकदा तरी किमान दीड कोटीचे बक्षीस असणारी लॉटरी जिंका.

२) एखाद्या कोट्याधिशाच्या एकुलत्या एक मुला/मुलीशी लग्न करा.

३) एखाद्या गडगंज संपत्ती असलेल्या नातेवाईकाच्या मृत्युपत्रांत आपले नाव प्रमुख वारस म्हणून येइल, अशी व्यवस्था करा.

४) शेअर बाजाराबद्दलचे सातत्याने हमखास खरे अंदाज वर्तवणारा एखादा ज्योतिषी वा तज्ज्ञ शोधा.

५) राजकारणांत प्रवेश करुन आमदार, खासदार. गेला बाजार किमान नगरसेवक व्हा.

७) स्मगलिंग, हवाला…किंवा तत्सम प्रकारचा व्यवसाय निवडा

८) स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु होण्यासही हरकत नाही.

आणि हे ‘सोपे’ उपाय नसतीलच जमणार, तर आणखी एक, शेवटचा उपाय आहे पहा जमलं तर-

९) आपल्या निवृतीपर्यंत आपल्या मासिक शिल्लक रक्कमेच्या निदान १० टक्के एखाद्या उत्तम ईक्विटी म्युच्युअल फंडात एसआय पीव्दारे गुंतवा.

आता मी सुचविलेल्या या मार्गात ह्या विभक्तीकरणाच्या बातमीने थोडासा फरक एवढाच की सौ. मॅकेंन्झींनी कोणत्याही कोट्याधिशाच्या मुलाशी लग्न केले नाही, त्यांनी एखाद्या ‘Value Investor’प्रमाणे एका जबरदस्त ‘intrinsic value’ असलेल्या पण त्यावेळी प्रकाशात न आलेल्या (undervalued)  जेफ याचेबरोबर आपली मोट (MOAT) बांधली. तब्बल २५ वर्षे राहिलेली ही (भावनिक) गुंतवणूक. आज सौ. मॅकेंन्झींना ६५,००० ००० ००० डॉलर्स देवून जाईल, असा माध्यमांचा अंदाज आहे.

मग? विचार कसला करताय? सध्या जबरदस्त intrinsic value असलेल्या पण अजून प्रकाशात न आलेला (undervalued) शेअर कोणता,  हाच ना? तो तर कोट्याधीश होण्यासाठीचा लाख मोलाचा प्रश्न आहे! त्याच्यासाठी मात्र आर्थिक सल्ल्लागाराचीच मदत घ्यावी लागेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)