कोटेश्वर मंदिरात एक लाख बेल पत्रे वाहण्याचा उपक्रम

सातारा – श्रावण कृष्ण पक्ष द्वादशी प्रदोष निमित्त सातारा शुक्रवार पेठेतील, कोटेश्वर देवस्थान येथे भाविकांनी एक लाख बेल पत्रे अर्पण केली. या सोबत रुद्राभिषेक व शिवसहस्त्र नामावली पठण कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले असल्याची माहिती संतोष पुजारी यांनी दिली आहे.

कोटेवश्वेर मंदिर सेवेकरी मंडळ व कोटेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वर्षापासून हा कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. बेल अर्पण केल्यानंतर सायकाळी महाआरतीने कार्यक्रमाची सांगता झाली व प्रसादाचे वाटप देखील करण्यात आले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)