कोटींनी खर्च करूनही श्रीगोंदा तालुक्‍यातील रस्ते “जैसे थे’च !

श्रीगोंदा – श्रीगोंदा तालुक्‍यातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी कोटींच्यावर खर्च करण्यात आला. मात्र, महिन्याच्या आतच रस्त्यांची अवस्था पुन्हा “जैसे थे’च झाली. संबंधित दोषींवर कारवाई करून रस्त्यांची दर्जेदाररीत्या दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा श्रीगोंदा तालुका कॉंग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत दरेकर यांनी दै. “प्रभात’शी बोलताना दिला.

यासंदर्भात दरेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांना निवेदन दिले आहे. यामध्ये म्हटले आहे की, बांधकाम विभागाने महिन्यापूर्वी तालुक्‍यातील रस्त्यांवरचे खड्डे बुजविण्यास सुरुवात केली होती. ते काम पूर्ण झाले. त्याला कोटींवर खर्च करण्यात आला. एकाच महिन्यात डांबरी पॅच निघून गेले. पुन्हा रस्त्याची दुरवस्था झाली. काम करणाऱ्या एजन्सीची चौकशी करण्यात यावी. काष्टी, मांडवगण व वांगदरी भागातील रस्ते अपघाताला आमंत्रण देत आहेत. बांधकाम विभागाने दुरुस्तीचे काम हाती न घेतल्यास कॉंग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)