कोटक महिंद्रा बॅंकेचे विशेष डेबिट कार्ड 

पुणे: कोटक महिंद्रा बॅंकेने (कोटक) पुणे रनिंग बियॉंड मायसेल्फच्या (पीआरबीएम) साथीने पूनावाला स्वच्छ शहर मॅरेथॉन 2018 या पुण्यातील मॅरेथॉनच्या निमित्ताने विशेष डेबिट कार्ड सादर केले आहे. या मॅरेथॉनसाठी कोटक एक्‍सक्‍लुझिव्ह बॅंकिंग पार्टनर आहे. मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या धावपटूंना व पीआरबीएमने आयोजित केलेल्या इतर फिटनेस कार्यक्रमातील सहभागींना हे विशेष डेबिट कार्ड दिले जाणार आहे.
या विशेष डेबिट कार्डसोबत जोडलेले बचत खाते वार्षिक 6 टक्‍केपर्यंत व्याज आणि पहिल्या वर्षी किमान शिल्लक न ठेवण्याचे स्वातंत्र्य यासारख्या लाभांसह मिळणार आहे असे कोटक महिंद्रा बॅंकेचे ब्रॅंच बॅंकिंगचे अध्यक्ष विराट दिवाणजी म्हणाले. पूनावाला स्वच्छ शहर मॅरेथॉन 2018 साठी कोटक एक्‍सक्‍लुझिव्ह बॅंकिंग पार्टनर आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)