कोझिकोड बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला दिल्लीत अटक

नवी दिल्ली: कोझिकोडमध्ये 2006 साली झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला राष्ट्रीय तपास संस्था अर्थात “एनआयए’ने दिल्ली विमानतळावर अटक केली आहे. मोहंम्मद अशर असे या 33 वर्षीय आरोपीचे नाव असून तो केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील थलासरी येथील रहिवासी आहे. तो फरार होता आणि त्याच्याविरोधात “एनआयए’ने 2010 मध्येच आरोपपत्रही दाखल केले आहे. सौदीमधून परत आल्या आल्या त्याला अटक करण्यात आली.

कोझिकोडमध्ये 3 मार्च 2006 र्प्की “केएसआरटीसी’ आणि मोफुसिल बस स्थानकांवर बॉम्बस्फोट झाले होते. त्यामध्ये दोघेजण जखमी झाले होते. तर मालमत्तेचेही नुकसान झाले होते. स्थानिक पोलिसांनी या प्रकरणी अशरसह 8 आरोपींविरोधात बेकायदेशीर गुन्हे प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांखाली आरोपपत्र दाखल केले होते. “एनआयए’ने 2009 साली या प्रकरणाचा तपास हाती घेतला होता. त्या तपासामध्ये अशर आणि अन्य एकजण फरार आरोपी पी.पी. युसुफ उर्फ पियुष यांनीच मुख्य आरोपींना स्फोटास मदत केली असल्याचे आढळून आले होते. अटक टाळण्यासाठी अशर 2007 मध्ये सौदी अरेबियाला पळून गेला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)