कोजागिरीला जाणता राजा प्रतिष्ठानकडून महाप्रसाद; नवरात्रोत्सवाची सांगता

वाकड – थेरगाव, दत्तनगर येथे नवरात्रात दांडिया, रास, गरबा व विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम झाले. कोजागिरीला सांगता झाली. जाणता राजा प्रतिष्ठानने नवरात्र उत्सवाचे आयोजन केले होते. या सर्वच कार्यक्रमांना नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. कोजागिरीला महाप्रसाद केला होता. माजी नगरसेवक सिद्धेश्वर बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली 12 वर्षे जाणता राजा प्रतिष्ठान अतिशय शिस्तबद्ध,  नवरात्री व कोजागिरी साजरी करते. परिसरातील नागरीक, विशेषतः महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी हजेरी लावतात. प्रतिष्ठानच्या मार्गदर्शक नगरसेविका झामाताई बारणे, माजी नगरसेवक सिद्धेश्वर बारणे यांनी स्वतः महाप्रसादाचे वाटप केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)