कोजागरीला रंगली संगीत खुर्ची

पिरंगुट- पिरंगुट परिसरात कोजागरी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
पिरंगुट येथील गणेश नगरमध्ये हिंदवी प्रतिष्ठानच्या वतीने महिलांसाठी भव्य संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जयश्री अनिल भिलारे या महाविजेत्या ठरल्या. त्यांना मानाची हिरकणी पैठणी व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये आठशे महिला सहभागी झाल्या होत्या. प्रथम क्रमांक रुपाली गिरी, रोहिणी जाधव, भाग्यशाली पठारे, मिरा जाधव, जयश्री भिलारे यांनी मिळवला. त्यांना सोन्याची नथ व चषक देण्यात आला. द्वितीय क्रमांक विजेत्या सविता साळुंके, प्रियांका पाटील, सुजाता मंकेश्वर, वैशाली गोसावी, मेघना मोरे यांना चांदीचे छल्ले व चषक देण्यात आले. तृतीय क्रमांक विजेत्या सुरेखा पाटील, श्रुती नारखेडे, आरती साबणे, मिना दिवार, सुनिता कदम चांदीचे पैंजण व चषक देण्यात आला. चतुर्थ क्रमांक विजेत्या सविता स्वामी, शितल वाघ, अश्विनी गोरे, ललिता सुर्यवंशी, अनिता बचने यांना चांदीची जोडवी व चषक देण्यात आला. पाचवा क्रमांक विजेत्या उज्वला गोडांबे, अश्विनी पैठणे, माया पाटील, सुनीता सपकाळ, नुतन गरुड यांना घड्याळ व चषक देण्यात आला. यावेळी पोलिस पाटील प्रकाश पवळे, महिला संघटिका स्वाती ढमाले, उपसंघटिका संगिता पवळे, राम गायकवाड, सरपंच सुप्रिया धोत्रे, उपसरपंच दिलीप पवळे, माजी सरपंच हेमलता मंडले, मनिषा पवळे, सुरेखा पवळे सदस्या छाया पवळे, वैशाली नवाळे, शारदा कुंभार, बापूसाहेब पवळे, माजी चेअरमन बाबासाहेब पवळे, माजी सरपंच ज्ञानेश्वर पवळे, रामदास पवळे आदी उपस्थित होते. माजी सरपंच ललिता पवळे व पिरंगुट व्यापारी संघाचे अध्यक्ष राहुल पवळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हिंदवी प्रतिष्ठान महिला मंडळानी स्पर्धेचे नियोजन केले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)