कोकमठाणात पत्नीवर गोळी झाडली, एकाला अटक

कौटुंबिक वादातून घडली घटना, खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

कोपरगाव – कौटुंबिक वादातून पत्नीवर गोळी झाडून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. शहरापासून जवळ असलेल्या कोकमठाण येथेरविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास हा गोळीबार झाला होता. सुनील विश्‍वनाथ रक्‍ताटे(वय 40, राहणार कोकमठाण) यांचा पत्नी माधुरी यांच्याबरोबर कौटुंबिक वाद होता.

27 ऑगस्टला दुपारी साडेतीनच्या सुमारास सुनीलनेरागाच्या भरात बंदुकीतून पत्नीवर गोळी झाडली. यानंतर घाईगडबडीत जखमी पत्नीस उपचारासाठी एका खासगी हॉस्पिटलमध्ये नेले. याप्रकरणी रवींद्र अंबादास कदम (राहणार पाचचारी, रवंदा, कोपरगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी रक्‍ताटे याला अटक करुन बेकायदा शस्त्र बाळगणे, खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांच्या मार्गदर्शनात साहाय्यक पोलीस निरीक्षक पी. वाय. कादरी करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)