कोकण पट्ट्यातील आंबा “हापूस’

मुंबई – हापूसच्या पेटंटबाबत असलेला देवगड आणि रत्नागिरीतील वाद अखेर मिटला आहे. कोकण पट्ट्यातील आंबा हा हापूस असल्याचा निर्वाळा मुंबईतील पेटंट कार्यालयात झालेल्या सुनावणीत देण्यात आला आहे. या निर्णयामुळे देवगड आणि रत्नागिरीची निराशा झाली असली, तरी दोन्ही आंबा उत्पादकांनी हा निर्णय मान्य केला आहे.

देवगड हापूस आणि रत्नागिरी हापूस या दोन्ही आंब्यांना 2017 मध्ये जीआय मानांकन देण्यात आले. मात्र, पेटंटवर दोन्ही उत्पादकांमध्ये वाद होता. हे प्रकरण पेटंट कार्यालयापर्यंत पोहोचले. त्यावेळी दोन्ही उत्पादकांनी हापूस नावावर दावा केला. मात्र, इंडियन पेटंटने दोन्ही पक्षांना धक्का देत वेगळाच निर्णय दिला. पालघरपासून सिंधुदुर्गापर्यंत कोकणच्या कोणत्याही पट्ट्यात पिकणारा आंबा हा “हापूस’ आंबा असल्याचे जाहीर केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)