रत्नागिरी : माझा विकासाला विरोध नाही. पण कोकणात रिफायनरी प्रकल्प नकोच, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा केले आहे. गेले तीन दिवस राज ठाकरे सिंधुदुर्ग- रत्नागिरीच्या दौऱ्यावर असून शुक्रवारी रत्नागिरीत पत्रकारांशी अनौपचारिकपणे बोलताना त्यांनी नाणार परिसरातील नियोजित तेल शुध्दीकरण प्रकल्पाला स्पष्ट विरोध दर्शवला.

कोकणासारखी सुपीक जमीन देशात कुठेच मिळणार नाही. येथील फळे, खाद्यपदार्थ अन्यत्र कुठेही नाहीत. एवढे सगळे असतानाही जमिनी विकून तुम्ही करणार काय, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. रिफायनरी गुजरातमध्ये नेऊ, असे मुख्यमंत्री सांगतात. प्रकल्प कुठेही न्या, पण इथे नको. पंतप्रधानांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्री वाट्टेल ते बोललात. प्रकल्प न्यायचा असेल तर अन्य राज्यात कुठेही न्या. गुजरातच कशाला हवे, असा टोला त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)