कोकणात जाणाऱ्यांनी ‘या’ पर्यायी मार्गाचा वापर करावा ; महामार्ग पोलिसांचे आवाहन

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनधारकांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन राज्य महामार्ग पोलिसांनी केले आहे. मुंबई गोवा महामार्गावरील कोंडी टाळण्यासाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरून कोल्हापूर मार्गे रत्नागिरी व सिंधुदुर्गकडे जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रायगड जिल्ह्यात जाणाऱ्या गणेशभक्तांनी पनवेल शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कळंबोली-पनवेल बायपास ते पळस्पे फाटा आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरून खोपोली-पाली – वाकण मार्गाचा वापर करावा.

तसेच रत्नागिरी व सिंधुदुर्गात जाणाऱ्या वाहनचालकांनी चिपळूनला जाणाऱ्यांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे मार्गे सातारा-उंब्रज-पाटण- कोयना नगर- कुंभार्ली घाट मार्गे खेर्डी-चिपळूण रस्त्याचा वापर करावा. हातखंबा येथे जाणाऱ्यांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे मार्गे सातारा-कराड-वाठार-टोप- मलकापूर-शाहूवाडी- आंबाघाट मार्गे लांजा – राजापूर मार्गावरून जावे.

कणकवलीला जाणाऱ्यांनी मुंबई पुणे एक्स्प्रेस वे मार्गे सातारा-कराड-कोल्हापूर शहरातून रंकाळा तलावावरून कळे-गगनबावडा घाट मार्गे वैभववाडी –कणकवली गाठावे.

मुंबईहून सावंतवाडीला जाणाऱ्या कोकणवासीयांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे मार्गे सातारा- कराड-कोल्हापूर-निपाणी- आजरा-आंबोली घाट मार्गे सावंतवाडीला जावे.

गणेशोत्सव काळात कोकणातील वाहतूक सुरळीत सुरू रहावी, यासाठी महामार्ग पोलिसांनी उपाययोजना केल्या असून, ठिकठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहतुकीसंदर्भात तसेच इतर माहितीसाठी महामार्ग पोलीसांची www.highwaypolice.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अथवा हेल्पलाईन क्रमांक 9833498334 व 9867598675 येथे संपर्क साधावा. तसेच 9503211100 व 9503511100 या क्रमांकावर संदेश पाठविता येईल, असे महामार्ग पोलिसांनी कळविले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)