“कोई मिल गया…’

  नीती अनीती

अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करण्यात आला. मात्र अजूनही या भूतलावर अधूनमधून चमत्कार होत असतात, ज्यांसमोर विज्ञान तंत्रज्ञान ही गुढघे टेकतो. दोन डोक्‍यांचे बालक, शेळीला सहा पाय, दोन हृदयांचे बाळ वगैरे वगैरे. असेच काही चमत्कार बघावयास मिळाले, ज्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे विद्वान ही तोंडात बोटं घालू लागली. संत ज्ञानेश्‍वर महाराजांनी रेड्याच्या तोंडून वेद म्हणवून घेतल्याच्या दंतकथा आहेत. त्यात या आधुनिक कथा ही जोडल्या जातील यातं शंका नाही. अशा या दोन भाग्यवानांनी आपल्यात झालेल्या या विस्मयकारी बदलांचे अनुभव कथन एकमेकांना सांगण्याचे ठरवले, आणि फोन लावलाचं…
‘ट्रिंग ट्रिंग ट्रिंग…!’
‘हैलू! एवढ्या रात्री कोण? सत्ता गेल्यापासून तर दिवसाही फोन येणे बंद झाले आहे.’
“सिंग साब, मी अरविंद केजरीवाल. कैसे हो मनमोहन जी! सर्वप्रथम तुमचे अभिनंदन हं.’
“अभिनंदन तर तुमचे पण हं अरविंद जी, मुख्यमंत्री झाल्याबद्दल…!
‘थॅंक्‍यू मनमोहन जी! दोघांनाही एकाच व्यक्तीच्या “मिडास टच’मुळे आज हा सोनियाचा दिस बघायला मिळतो आहे हं! आपले दोघांचेही कल्याण केले ते नमोजींनी हं! अगदी कायापालट केला. उन्हाळ्यातही मफलर घालून फिरत असे मी. अण्णासुद्धा खोकल्यावरून ओळखायचे मला.’
‘मग तुम्हाला नमोजींनी बंगलोरला उपचारासाठी जाण्यास सांगितले व तुम्ही आता एकदम फिट आहात, हो ना?’
‘हो तर, आता तर मला हिवाळ्यातही खोकला येत नाही. एकदाही न खोकता मी नमोंवर तासभर आरोपांचा भडीमार करतो. तुमचा अनुभव सांगा ना मनमोहन जी ‘
‘माझ्यावर मानसिक उपचार केले तब्बल चार वर्षे, ते सतत मला उचकवत असत. मला टोचून बोलत असत. मौनीबाबा म्हणत, काय खोटं होतं हा? विदेश दौऱ्यावर मी काही बोललो की, ते मलाच ऐकू येत नसे. मला सारे नावं ठेवतं ‘क्रिश’मध्ये ऋतिक रोशनला नावं ठेवतं तसे. पण नंतर मात्र ‘कोई मिल गया…’ अहो जादू झाली आणि आता तर परवा मीच नमोंना “मौनीबाबा’ म्हणालो. राहुल बाबाने तर आश्‍चर्याने मला चिमटाच घेतला.’
“माझा पण उद्धार झाला, धन्य झालो. थॅंक्‍स टू नमो.’
‘खरं आहे! सिद्ध पुरुष आहेत ते. बघा ना तुमच्या युवराजांना पण सर्वोच्च पद मिळाले ते त्यांच्याच कार्यकाळात. मला तर वाटते की “अच्छे दिन’ आले ते विरोधकांचे. एकच नाम नमो…’
भारावल्यागतं मनमोहन जी पण नामोच्चार सुरू करतात,
‘नमो …..नमो ….!’ पलीकडून ही प्रतिसाद मिळतो, अखंड जप सुरू होतो व दोघांच्याही हातांतून फोन गळून पडतात.

– धनंजय


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)