कोई भी देश परफेक्ट नही होता, उसे परफेक्ट बनाना पडता है…(प्रभात open house)

कोई भी देश परफेक्ट नही होता, उसे परफेक्ट बनाना पडता है…. ‘रंग दे बसंती’ या चित्रपटामधला हा डायलॉग संपूर्ण तरुणाईला आवडून गेला होता. हा डायलॉग सगळ्यांनाच पूर्णपणे पटलाही होता. शिवाय माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी सांगितल्याप्रमाणे २०२० मध्ये संपूर्ण जगभरात भारताकडेच सर्वात जास्त तरुण असतील आणि एका अर्थाने हे खरंही आहे. आज कुठलाही क्षेत्र घ्या… आपली सळसळती तरुणाई कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपली छाप तिथं सोडतेच. भारतीय तरुणाई आज विविध क्षेत्रात उंचच उंच भरारी घेतेय आणि हीच तरुणाई उद्याचा भारत घडवणार आहे, असं म्हंटलं तर ते वावगं ठरणार नाही.

शिवाय यंदाचा स्वातंत्र्यदिन हा ७१ वा स्वातंत्र्यदिन असणार आहे. सो, वर म्हंटल्याप्रमाणे आपला भारत देश आणखीन ‘परफेक्ट’ करण्यासाठी काय काय करावं लागेल, याबद्दलची तुमची मतं तुम्ही आम्हाला पाठवू शकता. राजकीय, क्रीडा, विज्ञान, मनोरंजन, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था इत्यादी सर्वच विषयांमध्ये परफेक्ट होण्यासाठी आपण काय करायला हवं किंवा आता जे सुरु आहे त्यामध्ये काय बदल करायला हवेत, याविषयी यंदाच्या प्रभात open house मध्ये तुम्ही तुमचं मत बिनधास्त पणे मांडू शकता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लेखासाठी शब्दमर्यादा  २००-२५० शब्दांची असावी. निवडक मतांना मंगळवारी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी प्रसिद्धी देण्यात येईल.  सोमवार १४ ऑगस्ट पर्यंत तुम्ही तुमचे लेख आमचा ईमेल prabhatonlinenews@gmaill.com वर पाठवू शकता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)